महिलेनं 7 कोटीमध्येही नाही विकलं घर, मग शॉपिंग मॉल बांधण्यासाठी बिल्डरने अशी वापरली ट्रीक

या महिलेचा घर फार महाग नव्हते, पण त्या जागेवर मॉल बांधायचा असल्याने विकासकांनी महिलेला सात कोटी रुपये देऊ केले.

Updated: Apr 4, 2022, 05:38 PM IST
महिलेनं 7 कोटीमध्येही नाही विकलं घर, मग शॉपिंग मॉल बांधण्यासाठी बिल्डरने अशी वापरली ट्रीक title=

मुंबई : काही गोष्टी लोकांसाठी इतक्या प्रिय असतात. ज्याची कोणीही किंमत लावू शकत नाही. या गोष्टी किंमतीच्याही खूप पलिकडे असतात. सध्या सोशल मीडियावर एका वृद्ध महिलेची अशीच एक बातमी समोर आली आहे. या महिलेसाठी आपलं घर इतकं महत्वाचं होतं की, त्याजागेसाठी तिला बिल्डर भरपूर पैसे देत होता परंतु ते तिनं नाकारलं. ज्यामुळे या बिल्डरला आपला मॉल बांधणं शक्य झालं नाही. पण अखेर यातून त्याने मार्ग काढलाच.

अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेच्या आग्रहामुळे एका बिल्डरला आपले शॉपिंग मॉलचे स्वप्न साकार करण्यासाठी तंगडतोड करावी लागली. या महिलेच्या जिद्दीपुढे या बिल्डरने जो काही मार्ग काढला तो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. ज्यामुळे ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली.

खरेतर बिल्डरला वॉशिंग्टनमध्ये नवीन शॉपिंग मॉल बांधण्यासाठी एका महिलेच्या घराची जमीन खरेदी करायची होती. कारण या महिलेचं घर त्या बिल्डरच्या शॉपिंग मॉलच्यामध्ये येतं होतं. यासाठी त्याने वृद्ध महिलेला 1 मिलियन डॉलर (सुमारे 7 कोटी रुपये) देऊ केले, परंतु या महिलेने त्यासाठी नकार दिला.

सिएटल टाईम्सच्या वृत्तानुसार, महिलेच्या नकारामुळे बिल्डरला त्याच्या मॉलचं डिझाइन बदलणं भाग पाडलं आहे. ज्यामुळे मॉलच्या आवारातच या महिलेचं घर ठेवण्यात आलं आणि त्याच्या बाजूने मॉल बांधलं गेलं.

या महिलेचा घर फार महाग नव्हते, पण त्या जागेवर मॉल बांधायचा असल्याने विकासकांनी महिलेला सात कोटी रुपये देऊ केले.

रक्कम वाढली, पण निर्णय बदलला नाही

नवीन शॉपिंग मॉल बांधण्यासाठी विकासकांनी परिसरात इतर घरे खरेदी केली होती. त्याने सुरुवातीला महिलेला $750,000 (रु. 5,73,16,875) देऊ केले. नंतर, 84 वर्षीय एडिथ मॅसफिल्डचे मन वळवण्यासाठी त्यांनी रक्कम $1 दशलक्ष (अंदाजे 7 कोटी रुपये) पर्यंत वाढवली. पण एडिथने तिचे घर विकण्यास स्पष्टपणे नकार दिला.

अशा स्थितीत बिल्डरला घर सोडून मॉल बांधावा लागला, परिणामी मॉलच्या मध्यभागी या महिलेचे घर उभे राहिलेले दिसते.

एडिथ मेसफिल्डने ही जमीन 1952 मध्ये $3,750 (रु. 2,86,637) मध्ये विकत घेतली होती आणि त्यावर बांधलेल्या घराची तिला विशेष जोड होती. कारण ते घर तिच्या कमाईचं होतं, ज्यामुळे ते घर सोडण्याची तिची इच्छा नव्हती.