पार्टीला जाण्यासाठी मुलीने कॅब मागवली, ड्रायव्हर आवडला, त्याच्याबरोबर तब्बल 7 तास...

Girl Spend 2 Lakh on Cab Fair: पार्टीला जाण्यासाठी एका तरुण मुलीने उबेर कॅब बूक केली. वेळेवर कॅब ड्रायव्हर पोहोचला, पण ड्रायव्हरला पाहताच मुलगी त्याच्या प्रेमात पडली आणि...   

Updated: Dec 19, 2022, 03:07 PM IST
पार्टीला जाण्यासाठी मुलीने कॅब मागवली, ड्रायव्हर आवडला, त्याच्याबरोबर तब्बल 7 तास...  title=

Friendship With Cab Driver: प्रेमात माणूस आंधळा होतो, असं बोललं जातं. प्रेम जात-पात, गरीब-श्रीमंत काही बघत नाही. याची अनेक उदाहरणं आपल्याला ऐकायला-वाचायला मिळतात. असंच एक प्रेमप्रकरण सध्या सोशल मीडियवर (Social Media) चांगलंच व्हायरल होत आहे. पार्टीला जाण्यासाठी एका 19 वर्षांच्या मुलीने उबेर कॅब (Uber Cab) बूक केली. कॅब वेळेवर आली पण कॅब चालकाला पाहताच ती पार्टीला (Party) जाण्याचं विसरूनच गेली. हे अजब-गजब प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा किस्सा स्वत: त्या मुलीने शेअर केला आहे. 

काय घडलं नेमकं?
ब्रिटनमधली (Briten) ही घटना असून इमोजेन निकोलसन (Imogen Nicholson) असं या 19 वर्षीय मुलीचं नाव आहे. इमोजेन ही श्रीमंत घराण्यातील आहे. आपल्या आजोबांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी इमोजेन घरातून निघाली. लंडन ते डरहॅमला ( London to Durham) जाण्यासाठी तीने उबेर कॅब बूक केली. सुरुवातीला या प्रवासासाठी तीला अनेक कॅब ड्रायव्हरने (Cab Driver) नकार दिला होता. कसातरी एक कॅब ड्रायव्हर या प्रवासासाठी तयार झाला. ठरलेल्या वेळेत ड्रायव्हर लंडनमधल्या तिच्या घराजवळ पोहोचला आणि इमोजेन डरहॅमसाठी कॅबने निघाली.

हे ही वाचा : ही आहे जगातली सर्वात सुंदर आणि Hot पोलीस ऑफिसर, फोटो व्हायरल झाल्यावर लोकं म्हणतायत आम्हाला अटक कर

प्रवासात ड्रायव्हरबरोबर झाली मैत्री
लंडन ते डरहॅमदरम्यानच्या प्रवासात इमोजेनची त्या कॅब ड्रायव्हरशी मैत्री झाली. इमोजेनला तो ड्रायव्हर आला. त्याचं दिसणं, त्याचं सोज्वळ बोलणं यावर इमोजेन भाळली. प्रवासात या इमोजेनने कॅब ड्रायव्हरशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. त्याच्याबरोबर गप्पा मारण्यात तिला खूपच आनंद वाटत होता. यादरम्यान, इमोजेनला ज्या ठिकाणी पोहोचायचं होतं, ते ठिकाण आलं. पण इमोजेनने कॅब ड्रायव्हरला लाँग ड्राईव्हची (Long Drive) विनंती केली. कॅब ड्रायव्हरनेही तिची विनंती मान्य केली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by imi x (@imogen.nicholson)

कॅबमधून तब्बल 7 तास फिरली

इमोजेनने आपला हा अनोखा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तीने म्हटलंय, मी माझ्या आजोंबवर खूप प्रेम करते. त्यांच्या वाढदिवसाला जाण्यासाठी मी कॅब बूक केली. पण प्रवासाता मला एक चांगला मित्र (True Freind) भेटला. त्याच्याबरोबर तब्बल 7 तास कॅबने प्रवास केला. या प्रवासादरम्यान आम्ही खूप गप्पा मारल्या. इतकंच नाही तर त्याच्याबरोबर कॉफी प्यायले, सँडविच आणि केकही खाल्ला. तास तासांच्या प्रवासासाठी इमोजेनने तब्बल 2 लाख रुपये मोजले. याच्या बिलाचे फोटो तीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.