मुंबई : आपण हे पाहिलं आहे की, आपल्या आजूबाजूला असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची परिस्थिती ही अत्यंत वाईट असते. त्यामुळेच त्यांना इच्छा नसतानाही हे सगळं काम करावं लागतं. परंतु एवढं असून ही या सफाई कामगारांना जास्त पैसे कमावण्याची संधी मिळत नाही. कमी शिक्षणामुळे त्यांच्यावर अशी परिस्थीती ओढावते. ज्यामुळे त्यांची अर्थिक परिस्थीती खालावलेली राहाते. परंतु तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की जगात असा एक देश आहे. जेथे स्वच्छता कर्मचार्यांचा पगार हा डॉक्टर-इंजिनीअरपेक्षा जास्त आहे.
तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे पूर्णपणे सत्य आहे. याचे कारण म्हणजे देशात स्वच्छता कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता.
ऑस्ट्रेलियात स्वच्छता कर्मचार्यांची मागणी इतकी आहे की, त्यांना डॉक्टर-इंजिनियरपेक्षा जास्त पगार मिळत आहे. कंपन्या सफाई कामगारांच्या पगारात तासाभराने वाढ करत आहेत. त्यामुळे त्यांचा पगार एक कोटींपर्यंत पोहोचत आहे. सफाई कामगारांना महिन्याला सरासरी आठ लाख रुपये वेतन मिळत आहे. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे असे असतानाही सफाई कर्मचारी झाले आहेत. वार्षिक एक कोटीपर्यंत पगार देण्यास कंपन्या तयार आहेत.
एका मीडिया रिपोर्टनुसार, सिडनीस्थित क्लिनिंग कंपनी अॅब्सोल्युट डोमेस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक जो वेस म्हणतात की, असे फार कमी लोक आहेत, ज्यांना साफसफाई चांगली करता येते. त्यामुळे आहे त्या लोकांना टिकवून ठेवण्यासाठी त्यांना जास्तीचा पगार द्यावा लागतो. कंपनीने सफाई कर्मचाऱ्यांच्या पगारात 3600 रुपये/तास वाढ केली आहे.
2021 पासून ऑस्ट्रेलियात स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. एक वर्षापूर्वी कंपन्या त्यांना 2700 रुपये प्रति तास देत असत. आता कंपन्या सफाई कामगारांना 3500-3600 रुपये तासाला देण्यास तयार आहेत. परंतु गंमत अशी की एवढा पगार देऊनही सफाई कामगार मिळत नाहीत.
ऑस्ट्रेलियातील अनेक कंपन्या क्लिनर न मिळाल्याने त्रस्त आहेत. काही कंपन्यांनी ताशी 4700 रुपयांपेक्षा जास्त पगार देऊ केला आहे, मात्र त्यानंतरही सफाई कामगार मिळत नाहीत. त्यांनी सांगितलं की आम्ही सफाई कामगारांना खिडक्या आणि गटर साफ करण्यासाठी वार्षिक 82 लाख रुपये देण्यास तयार आहोत.