हे काय! रस्त्यावर उतरवलं विमान? व्हायरल VIDEO अंगावर काटा आणणारा

गाड्यांच्या रस्त्यावर अचानक धावू लागलं विमान, दृष्य पाहून कार चालकांच्या पायाखालची जमीनच सरकली, VIDEO व्हायरल

Updated: Jul 10, 2022, 06:45 PM IST
 हे काय! रस्त्यावर उतरवलं विमान? व्हायरल VIDEO अंगावर काटा आणणारा title=

अमेरिका : तुम्ही जर हायवेवर कार चालवत असाल आणि अचानक तुमच्यासमोर विमान आलं तर, तुम्हाला धक्काचं बसेल ना, कारण भरधाव कारच्या हायवेवरील शर्यतीत हवेत उडणार विमान कस येणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.मात्र अशी घटना अमेरीकेत घडलीय. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आणणारा आहे.  

अमेरीकन मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या कॅरोलिन शहरातल्या एका हायवेवर अचानक विमान उतरवल्याची घटना घडली. विमानाचे इमर्जन्सी लँडिंग होत असल्याची कोणतीच पुर्वकल्पना कार चालकांना नव्हती. या उलट हायवेवर तुफान स्पीडमध्ये कार धावत होत्या. अशा जोखीम भऱ्या प्रसंगी पायलटने विमान उतरवण्याच आव्हान घेत, ते यशस्वी उतरवलं. 

इमर्जन्सी लँडिंगचं कारण काय?
पायलट व्हिन्सेंट फ्रेझर सिंगल इंजिन असलेले विमान उडवत होते. व्हिन्सेंटसोबत त्याचे सासरेही विमानात उपस्थित होते. त्यानंतर अचानक इंजिन काम करण बंद झालं. पायलट व्हिन्सेंट यांनी तात्काळ याबाबत प्राधिकरणाला माहिती दिली. ज्यावर प्राधिकरणाने त्यांना कठीण पृष्ठभागावर किंवा रस्त्यावर उतरण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यानंतर सुरक्षित लँडिंगसाठी व्हिन्सेंटने विमान हायवेच्या दिशेने वळवत ते रस्त्यावर यशस्वीरीत्या उतरवले. ही सर्व घटना विमानात बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली होती. या संदर्भातला व्हिडिओ आता समोर आला आहे.  

दरम्यान इकडे रस्त्यावर गाडी चालवणारे लोकही आश्चर्यचकित झाले होते की, विमान इतके जवळ का येत आहे. लोक गाड्या घेऊन इकडे तिकडे धावू लागले. मात्र पायलट व्हिन्सेंट फ्रेझर यांनी विमान मोठ्या काळजीने रस्त्यावर उतरते. तेथील अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे खूप तणावाचे काम होते, पण पायलटने लँडिंग खूप चांगले केले.