काबूल : Kabul Airport : अफगाणिस्तानातून (Afghanistan Updates) आताची आलेली मोठी बातमी म्हणजे तालिबानी दहशतवादी (Taliban Terrorists) काबूल विमानतळावर घुसले आहेत. तालिबानने काबूल विमानतळावर प्रवेश करत ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे. (Taliban in Afghanistan) दोन दिवसांपूर्वी काबूल विमानतळ साखळी बॉम्बस्फोटांनी हादरुन गेले होते. यात कित्येक निरापराध लोकांचा बळी गेलेत. तसेच अमेरिकन लष्कर कमांडोही मारले गेले होते. आता तालिबानी विमानतळावर घुसल्याने पुन्हा हल्ल्याची भीती व्यक्त होत आहे. (Situation in Afghanistan)
तालिबानच्या 313 बद्री स्पेशल फोर्स युनिटने काबूल विमानतळाच्या लष्करी विभागात प्रवेश केला आहे. आतापर्यंत काबूल विमानतळ अमेरिकन सैन्याच्या ताब्यात होता. काबूल विमानतळाद्वारे संपूर्ण जग अफगाणिस्तानशी जोडलेले होते.
बुधवारी काबूल विमानतळावर साखळी स्फोट (Kabul Airport Blast) झालेत. ज्यात 13 अमेरिकन सैनिकांसह 170 लोक मारले गेले. इस्लामिक स्टेट खोरासन प्रांतने (IS-KP) या स्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे. या स्फोटात अमेरिकन कमांडो मारले गेल्याने अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आरपारची लढाई लढणार असेच स्पष्ट केले. तालिबानी दहशतवादी शोधून काढून त्यांना ठार केले जाईल, असा इशारा बायडेन यांनी दिला आहे.
दरम्यान, यूएस सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल फ्रँक मॅकेन्झी (Frank McKenzie) म्हणाले की, सैन्यांना अधिक सतर्क राहण्यास सांगितले आहे. आयएसआयएसकडून आणखी हल्ले होण्याची भीती आहे. विमानतळ पुन्हा लक्ष्य केले जाऊ शकते. मात्र, तालिबानकडे विमानतळ चालवण्याचा कोणताही अधिकार नसल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
विशेष म्हणजे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन साकी (Jen Psaki) यांना भीती वाटते की काबूलमध्ये आणखी स्फोट होऊ शकतात. ते म्हणाले की, दहशतवाद्यांना या भूमीवर यापुढे राहायचे नाही.
दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन अमेरिकेने काबूल विमानतळाची सुरक्षा वाढवली आहे. अमेरिकेने तालिबान आणि हक्कानी नेटवर्कचे वेगळे गट म्हणून वर्णन केले आहे.
काबूल विमानतळावरील हल्ल्यानंतर अमेरिकेत त्याबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर अमेरिकेने IS-KP या दहशतवादी संघटनेकडून सूड घेण्याची घोषणा केली आहे. ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे की, अमेरिका निश्चितपणे आपले शत्रू शोधून काढेल आणि त्यांना कायमचे संपवेल.