तालिबानची भीती! Afghanistan मध्ये बुरखा घेण्यासाठी का होतोय महिलांची गर्दी ?

परदे मे रहने दो, असं का म्हणतायेत अफगाणी महिला.... 

Updated: Aug 18, 2021, 05:15 PM IST
तालिबानची भीती! Afghanistan मध्ये बुरखा घेण्यासाठी का होतोय महिलांची गर्दी ?  title=
संग्रहित छायाचित्र

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान राज सुरु झाल्या क्षणापासून साऱ्या जगभरातून या देशासाठी चिंता व्यक्त केली जात आहे. तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान गेल्यानंतर तिथं अनेक गोष्टी बदलल्या किंबहुना आणखी बदल होणं सुरुच आहे. अशातच आता काही भागांमध्ये नागरिकांचं आयुष्य किमान रुळावर येताना दिसत आहे. 

अफगाणिस्तानातील काही बाजारपेठा सुरु झाल्या असून, सर्व नाही; पण सर्वच दुकानं सुरु झालेली नाहीत. काही दुकानं मात्र सुरु झाली असून, त्या दुकानांमध्ये खरेदीचं प्रमाणही वाढत असल्याचं कळत आहे. 'सीएनएन'कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानात बुरख्यांची मागणी आणि खप वाढला आहे. (burqas)

महिलांचा (Afghan woman) चेहरा झाकणारा हा पेहराव अफगाणिस्तानात बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. पण, तालिबानच्या सत्तेत त्याची मागणी आणखी वाढली असून, दुकानांमध्ये पुरुष आपल्या घरातील स्त्रियांसाठी बुरखा नेताना दिसत आहेत. तालिबानच्या भीतीपोटी अफगाणिस्तानमध्ये महिला अशी तयारी करत आहेत. 

Sharia Rules | तालिबानची पहिली पत्रकार परिषद, शरियत कायदा आणि महिलांच्या अधिकाराबाबत यू-टर्न?

खुद्द तालिबानकडूनच महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही असं सांगण्यात आलं आहे. महिलांना शिक्षण, नोकरी किंवा मुक्तसंचारापासून वंचित ठेवलं जाणार नाही असं सांगणयात येत असलं तरीही तेथील महिलांच्या मनात असणारी भीती मात्र काही केल्या कमी झालेली नाही हेच स्पष्ट होत आहे. तालिबानकडून महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार असं चित्र असतानाच या संघटनेकडून मात्र अनेक मुद्द्यांवर जनतेला सकारात्मक मार्गानं आश्वस्त करण्यात आलं आहे. येत्या काही दिवसांमध्येच तेथील वास्तववादी चित्र जगासमोर येईल. 

तालिबाननं नेमकं काय म्हटलं? 

तालिबानने (Talibans) अफगाणिस्तावर कब्जा मिळवल्यानंतर 17 ऑगस्टला पहिली पत्रकार परिषद (Talibans first press conference) घेतली. अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर आता तेथील जनजीवनासह विशेषत: महिल्यांच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे, त्यांना शरियत कायद्याचे (Sharia Rules) पालन करावे लागणार का, याबाबतही तालिबानी प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिदी (zabihullah mujahid) यांनी स्पष्ट केलं. महिलांच्या कोणत्याही हक्कांचं उल्लंघन इथं होणार नसून त्यांना पुरुषांच्या बरोबरीची वागणूक दिली जाणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.