भविष्यातील 2671 मधून परत आला Time Traveller; आयुष्य वाढवणारे फळ मिळत असल्याचा दावा

भविष्यातील 2671 मधून परत आल्याचा दावा एका टाईम ट्रॅव्हलरने केला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून त्याने भविष्याबाबत अनेक खळबळजनक दावे केले आहेत.   

Updated: Oct 21, 2023, 10:27 PM IST
भविष्यातील 2671 मधून परत आला Time Traveller; आयुष्य वाढवणारे फळ मिळत असल्याचा दावा title=

Time Traveller : एलियन्स प्रमाणे Time Traveller देखील एक कल्पना असल्याचे म्हंटले जाते. मात्र, एलियन प्रमाणेच Time Traveller बाबातही अनेक दावे केले जातात. अनेक जण Time Traveller असल्याचे सांगच भविष्यात जाऊन आल्याची बचावणी करतात. असाच एक Time Traveller सध्या चर्चेत आहे.  भविष्यातील 2671 मधून परत आल्याचा दावा या टाईम ट्रॅव्हलरने केला आहे. भविष्यात आयुष्य वाढवणारे फळ मिळत असल्याचा दावा देखील त्याने केला आहे. त्याच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. 

कोण आहे खळबळजनक दावा करणारा टाईम ट्रॅव्हलर

एनो अलारिक असे या टाईम ट्रॅव्हलरचे नाव आहे. TikTok वर @theradianttimetraveller या नावाने तो व्हिडिओ शेअर करत असतो. नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने भविष्यातील 2671 या वर्षात भ्रमण करुन आल्याचा दावा केला आहे. भविष्यातील वर्ष कशी असतील. पृथ्वीवर आणि मानवावर याचा काय परिणाम होईल याबाबत त्याने अनेक अत्यंत खळबळजनक दावे केले आहेत. 

भविष्याबाबत खळबळजनक दावे

अलारिक याने TikTok वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. अनेक व्हिडिओच्या माध्यमातून त्याने कथितपणे भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल चित्र विचित्र दावे केले आहेत. भविष्यात शास्त्रज्ञांना असे फळ मिळेल जे मानवी शरीराचे वृद्धत्व थांबवेल आणि लोक खूप दीर्घायुष्य जगतील असा दावा अलारिक याने केला आहे. 

2024 हे वर्ष इतिहासातील भयानक वर्ष

अलारिक याने भविष्याबात अत्यंत खळबळजनक दावे केले आहेत. विशेष म्हणजे त्याने तारखांसहित भविष्यात काय काय घडणार हे सांगितले आहे. 22 नवंबर, 2023 रोजी अनुवंशिक दोष दूर करणे सहज शक्य होणार आहे. आपल्या आवडीनुसार मुल तयार करता येईल. बहुतांश लोक एकसारखे दिसतील. 28 डिसेंबर 2023 रोजी शास्त्रज्ञांनी भूगर्भात एक नवीन फळ सापडेल. या फळाला अॅस्ट्रलम असे म्हंटले जाईल. हे फळ खाल्ल्यावर वृद्धत्व कमी होईल. हे फळ खाल्ल्यावर आयुष्य 200 वर्षांनी वाढेल असा दावाही या टाईम ट्रॅव्हलरने केला आहे. 9 फेब्रुवारी 2024 गिझाच्या ग्रेट पिरॅमिडच्या वर 'टाइम स्फेअर' नावाचा बॉल दिसेल. जो कोणी याला स्पर्श करेल त्याला भूतकाळात डोकावता येईल. तसेच भविष्यात भ्रमण करता येईल. असे अनेक दावे या टाईम ट्रॅव्हलरने केले आहेत.  अनेकांनी या टाईम ट्रॅव्हलरच्या दाव्यांची खिल्ली उडवली आहे.