२०१८ ला निघालेले 'हे' विमान २०१७ मध्ये पोहचले

  हवाईएन एअरलाईनच्या विमानाने प्रवास कारणार्‍या प्रवाशांना यंदा नववर्षाचं स्वागत करण्याची दोनदा संधी मिळाली आहे. 

Updated: Jan 3, 2018, 09:30 AM IST
२०१८ ला निघालेले 'हे' विमान २०१७ मध्ये पोहचले   title=

ऑकलंड :  हवाईएन एअरलाईनच्या विमानाने प्रवास कारणार्‍या प्रवाशांना यंदा नववर्षाचं स्वागत करण्याची दोनदा संधी मिळाली आहे. 

कोणते होते विमान ? 

फ्लाईट HAL446 हे विमान न्युझिलंडच्या ऑकलंड मधून २०१८ मध्ये निघाले म्हणजेच रात्री ११.५५चे विमान १२.०५ ला निघाले. त्यामुळे त्यांना २०१८ चे स्वागत करण्याची पहिली संधी ऑकलंडमध्ये मिळाली. त्यानंतर होनोलूलूला हे विमान पोहचले तेव्हा तेथे ३१ डिसेंबरची सकाळ म्हणजेच १०.१६ वाजले होते.  

प्रवाशांसाठी डबल सेलिब्रेशन  

न्युझिलंड आणि हवाईमध्ये सुमारे २३ तासांचा फरक पडतो. न्युझिलंड हे २३ तास पुढे आहे.  त्यामुळे विमान लॅन्ड झाले त्या संध्याकाळी प्रवाशांना पुन्हा न्यू इयर सेलिब्रेट करण्याची संधी मिळाली आहे. 

होनोलूलू हे जागतिक वेळेनुसार  GMT-10 तर ऑकलंड हे GMT+13 नुसार चालते. त्यामुळे त्यांच्या ट्राव्हलिंग वेळेत बदल आढळला.