क्रूरतेचा कळस! 39 कुत्र्यांची बलात्कार करुन हत्या; टॉर्चर रुममध्ये न्यायचा अन् कॅमेरा सुरु करुन...; न्यायाधीशही हादरले

ऑस्ट्रेलियामध्ये अंगावर शहारे आणणारं एक प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीला 39 श्वानांचा छळ, बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. त्याची क्रूरतेची हद्द इतकी होती की, प्राण्यांवर अत्याचार करताना तो व्हिडीओ शूट करायचा.   

शिवराज यादव | Updated: Sep 27, 2023, 06:11 PM IST
क्रूरतेचा कळस! 39 कुत्र्यांची बलात्कार करुन हत्या; टॉर्चर रुममध्ये न्यायचा अन् कॅमेरा सुरु करुन...; न्यायाधीशही हादरले title=

मनात वाईट हेतू असेल तर कित्येकदा माणूस सर्व मर्यादा ओलांडतो. अनेकदा तर आपण विचारही करु शकत नाही इतक्या क्रूरपणे हे गुन्हे केले जातात. त्यामुळे जेव्हा ते समोर येतात तेव्हा बसणारा धक्काही तितकाच मोठा असतो. एखादी व्यक्ती इतका क्रूर गुन्हा कसा काय करु शकतो असा विचार यावेळी सतावत राहतो. ऑस्ट्रेलियामधील अशाच एका प्रकरणाने सध्या खळबळ माजली आहे. ब्रिटनच्या एका प्राणीशास्त्रज्ञाने अशा एका गुन्ह्याची कबुली दिली आहे ज्यामुळे सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. 

39 श्वानांचा छळ, बलात्कार आणि हत्येची 60 प्रकरणं

एडम ब्रिटन नावाच्या एका मगर तज्ज्ञाला एकूण 39 श्वानांचा छळ, बलात्कार आणि हत्येच्या 60 प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. 52 वर्षीय एडमने कोर्टात आपले सर्व गुन्हे कबूल केले आहेत. 2014 पासून एडमने हे गुन्हे करण्यास सुरुवात केली होती असं समजत आहे. कथितपणे त्याने आतापर्यंत 42 श्वानांचं लैंगिक शोषण केलं आहे. यामध्ये त्याच्या दोन पाळीव श्वानांचा समावेश आहे. 

एडमने एकेकाळी प्रसिद्ध ब्रॉडकास्टर डेव्हिड एटनबरो यांना होस्ट केलं आहे. याशिवाय बीबीसी आणि नॅशनल ज्युओग्राफिकसोबतही काम केलं आहे. एप्रिल 2022 मध्ये अटक करण्यात आल्यानंतर एडमने ही जनावरं म्हणजे खेळणी असल्याचं म्हटलं होतं. पोलिसांनी अटक करण्यापूर्वी 10 वर्ष एडमने आपल्याच एका स्विस शेफर्डवर बलात्कार केला होता. 

बलात्कारासाठी ऑनलाइन पोर्टलवरुन शोधायचा श्वान

आपली क्रूर इच्छा पूर्ण करण्यासाठी एडम ब्रिटमधून ऑस्ट्रेलियात गेला होता. तिथे त्याने पाळीव जनावरांच्या मालकांना सेवा देण्यासाठी एक ऑनलाइन पोर्टल सुरु केलं होतं. ज्या लोकांना प्रवासाला जाताना आपल्या पाळीव जनावरांची काळजी घेण्यासाठी केअरटेकरची गरज भासत असे त्यांना तो सेवा पुरवत होता. पाळीव जनावरांची काळजी घेण्याच्या नावाखाली तो पाळीव जनावरांचं शोषण करायचा. 

टॉर्चर रुममध्ये शूट केले बलात्काराचे व्हिडीओ

रिपोर्ट्सनुसार, त्याने आपला एक व्हिडीओही तयार केला होता. या व्हिडीओत तो एका 'टॉर्चर रुम'मध्ये उभा असल्याचं दिसत आहे. तिथे तो जनावरांनी मारहाण करत होता. इतकंच नाही तर आरोपीने प्राण्यांवर बलात्कार करतानाचे फोटो आणि व्हिडीओ ऑनलाइन शेअर केले होते. 

उत्तर भागातील सर्वोच्च न्यायालयाने प्राण्यांसह केलेल्या क्रूरतेच्या 56 प्रकरणात आरोपीला दोषी ठरवण्यात आलं आहे. तसंच बाल लैंगिक शोषणाच्याही 4 प्रकरणी दोषी धरलं आहे. सध्या त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. 13 डिसेंबर 2023 ला त्याला शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे.