काबूल : अफगाणिस्तानमध्ये तलिबानींची लढाई अद्याप संपलेली नाही. पंजशीर खोऱ्यातही लढाऊ तालिबानींसाठी मोठ संकट बनले आहेत. अफगाणी सैन्याने माघार घेतली असली तरीही पंजशीरमध्ये आपली सत्ता स्थापन करण्यासाठी तालिबानींना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, पंजशीरच्या लढाऊंनी मोठ्या संख्येने तालिबानी मारल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात तालिबानचे खूप नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
अफगाणिस्तानच्या पंजशीरमध्ये तालिबानच्या विरोधात होणाऱ्या मोर्चेबंदीला थांबविण्यासाठी सुमारे 3000 तालिबाननी पंजशीरकडे रवाना झाले आहेत . पंजशीरच्या दिशेने जाणाऱ्या अंद्राब व्हॅलीत तालिबान आणि रेजिस्टेंस फोर्समध्ये गोळीबार झाला. या लढाईमध्ये तालिबानचं प्रचंड नुकसान झालं असल्याची माहिती समोर येत आहे.
Talibs have massed forces near the entrance of Panjshir a day after they got trapped in ambush zones of neighboring Andarab valley & hardly went out in one piece. Meanwhile Salang highway is closed by the forces of the Resistance. "There are terrains to be avoided". See you.
— Amrullah Saleh (@AmrullahSaleh2) August 22, 2021
अहमद मसूदच्या नेतृत्वाखालील रेजिस्टन्स फोर्स तालिबानशी लढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानने कारी फसीहुद दिन हाफिजुल्लाच्या नेतृत्वाखाली शेकडो दहशतवाद्यांना पंजशीरवर हल्ला करण्यासाठी पाठवले. बागलाण प्रांताच्या अंद्राब खोऱ्यात पंजशीरच्या लढाऊंनी त्यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात 300 तालिबानींना ठार केल्याचा दावा केला जात आहे. ज्यामुळे आता तालिबानचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. अफगानिस्तान के कार्यकारी राष्ट्रपती अमरुल्ला सालेह ट्विट करत म्हणाले की, 'अंद्राब व्हॅलीमध्ये तालिबान आमच्या जाळ्यात अडकले आहेत. पंजशिरच्या सिमेवर अनेक तालिबानी दाखल झाले आहेत.'
तालिबानने अफगाणिस्तानचे 33 प्रांत काबीज केले आहेत. एकच पंजशीर प्रांत आहे जिथे तालिबानची सत्ता नाही.खरं तर, पंजशीरमध्ये अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूद आणि स्वतःला अफगाणिस्तानचा काळजीवाहू अध्यक्ष घोषित करणारे अमरूल्लाह सालेह तालिबानला कडवी झुंज देत आहेत. पंजशीर हा एकमेव प्रांत आहे जिथे तालिबानच्या विरोधात नवीन नेतृत्व तयार केले जात आहे, जे तालिबानचे अधिकार स्वीकारण्यास नकार देत आहे.