साठीतल्या बॉयफ्रेंडला घेऊन 19 वर्षांची लेक आली घरात; आईवडिलांनी रोखलं दारात

प्रेमाला कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. प्रेमात असलेले व्यक्ती वयात असलेलं  अंतर देखील पाहात नाहीत. 

Updated: Sep 21, 2021, 10:51 AM IST
साठीतल्या बॉयफ्रेंडला घेऊन 19 वर्षांची लेक आली घरात; आईवडिलांनी रोखलं दारात  title=

वॉशिंग्टन : प्रेम ही एक चिराकल टिकणारी भावना आहे. प्रेमाला कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. प्रेमात असलेले व्यक्ती वयात असलेलं  अंतर देखील पाहात नाहीत. ही गोष्ट एका अमेरिकन जोडप्याने खरी करून दाखविली आहे. या जोडप्यामध्ये 10 किंवा 15 वर्षांचं अंतर नाही तर तब्बल  42 वर्षांचं अंतर असून दोघे एकमेकांसोबत अत्यंत आनंदी आहेत. 19 वर्षीय लष्करी पोलीस अधिकारी ऑड्रे चेयेने-स्माइली मूनने 61 वर्षीय केविनशी लग्न केले आहे आणि आता दोघेही मुलाची योजना करत आहेत.

ऑड्रे चेयेने-स्माइली मून (Audrey Cheyenne-Smiley Moon) आणि केविन (Kevin) यांची ओळख 2020 साली एका डेटिंग ऍपच्या माध्यमातून झाली. 42 वर्षांच्या वयात फरक असूनही, स्माइली मून सुरुवातीला केविनच्या प्राफाईलवर आकर्षित झाल्या, ज्यामध्ये त्यांना कळालं की केविन एक अनुभवी लष्करी पोलीस अधिकारी आहे.

Audrey Cheyenne-Smiley Moon and Kevin Love Story

'द सन'ने दिलेल्या रिपोर्टनुसार  काही महिने ऑनलाईन चॅटिंग केल्यानंतर दोघांनी भेटण्याचा निर्णय घेतला. भेटल्यानंतर दोघांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पहिल्या भेटीतचं आम्ही एकमेकांना किस केलं असं देखील स्माइली म्हणाल्या. त्यानंतर स्माइली यांनी केविनबद्दल कुटुंबियांना सांगण्याचा निर्णय घेतला. 19 वर्षांच्या मुलीला 61 वर्षांच्या  बॉयफ्रेंडसोबत पाहून आई-वडिलांना राग अनावर झाला. 

स्माइलीचे आई-वडिल 43 आणि 38 वर्षांचे आहेत. आई-वडिलांनी या नात्यास नकार दिला. जेव्हा स्माइली, केविनची कुटुंबियांसोबत भेट करून देण्यासाठी गेल्या तेव्हा आई-वडिलांना घरी चक्क पोलिसांना बोलावलं. पण केविन आणि स्माइलीने एकमेकांची साथ सोडली नाही. अखेर आई-वडिलांनी त्यांच्या नात्याला होकार दिला. 

केविनबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचं लग्न झालेलं आहे. शिवाय त्यांना 2 मुलं आहेत. त्या मुलांचं वय 23 आणि 16 वर्षे आहे.  महत्त्वाचं म्हणजे केविनच्या दोन मुलांना देखील वडिलांच्या रिलेशनशिपबद्दल काही अडचन नाही. ते एकमेकांसोबत आनंदी असल्याचं देखील सांगितलं जात आहे. दरम्यान स्माइली आणि केविनने 1 ऑगस्ट रोजी लग्न केलं आहे.