अमेरिकेत १३ लाख लोकांना कोरोनाची लागण, मृतांचा आकडा ८० हजारांच्या वर

अमेरिकेत कोरोनाचा कहर, व्हाईट हाऊसमध्ये विषाणूचा शिरकाव

Updated: May 12, 2020, 08:56 AM IST
अमेरिकेत १३ लाख लोकांना कोरोनाची लागण, मृतांचा आकडा ८० हजारांच्या वर  title=

वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोनामुळे मृतांची संख्या 80 हजारांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत 13 लाखाहून अधिक रुग्ण येथे आढळली आहेत. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 776 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 80 हजार 562 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर देशातील एकूण रुग्णांची संख्या 13 लाख 29 हजारवर पोहोचली आहे.

अमेरिकेत कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यात गंभीरपणे अपयशी ठरलेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आता ही धोक्याची घंटा लक्षात येत आहे. कोरोनाचे पाय आता व्हाइट हाऊसच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच्या वेलेट आणि उपराष्ट्रपती माइक पेंस यांचे सचिव यांना कोरोनाची लागण झाली आहे. पण आता ट्रम्प आणि पेन्स यांना अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. पण ट्रम्प सतत मास्क लावण्यास नकार देत आहेत. 73 वर्षीय ट्रम्प यांचं वय अधिक असल्याने त्यांना कोरोनाचा धोका असल्याचे मानले जात आहे.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हतबल आहेत. पण ते म्हणतात की, आम्ही या भयंकर शत्रूचा पराभव करु. आपण आपली अर्थव्यवस्था पुन्हा जिवंत करू. आम्ही तिसऱ्या तिमाहीत जात आहोत आणि आम्ही चांगली कामगिरी करणार आहोत. आम्ही चौथ्या तिमाहीत खूप चांगले काम करू आणि पुढच्या वर्षी मला असे वाटते की आमच्याकडे एक चांगले वर्ष आहे.'

संपूर्ण जगाबद्दल बोलायचे झाले तर कोरोनाच्या रुग्णांची संख्या 41 लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत एकूण 41 लाख 74 हजार 651 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 2 लाख 85 हजार 945 लोकांचा बळी गेला आहे. आतापर्यंत 14 लाख 55 हजार ७३१ लोकं बरे झाले आहेत.