लंडन : बऱ्याचदा आपण स्वस्तातले साबण किंवा कमी किंमतीत जास्त मिळणारे साबण वापरण्यावर भर देतो. मात्र असा साबण वापरणं धोकादायक ठरू शकतं. फक्त त्वचेच्याच दृष्टीकोनातून नाही तर अनेक धोकेही निर्माण होऊ शकतात. अशा साबणांमध्ये जास्त प्रमाणात केमिकलचा वापरही केलेला असतो. त्यामुळे या साबणांचा त्रास होऊ शकतो. स्वस्त अंघोळीचा साबण किती धोकादायक असू शकतो, आज ही बातमी वाचून तुम्हाला अंदाज येईल.
4 वर्षांच्या मुलाला अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार हा चिमुकला अंघोळ करत होता. त्याचवेळी साबणाच्या फेसाला अचानक आग लागली. या आगीत तो होरपळला. त्यामुळे जखमी अवस्थेत त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हा धक्कादायक प्रकार इंग्लंडमधील लिव्हरपूल शहरात घडल्याची माहिती मिळत आहे.
मुलांची स्कीन सेन्सिटीव्ह असते याचा विचार करून अनेक पालक त्यांच्यासाठी विशेष साबण आणतात. मात्र काहीवेळा पैसे वाचवण्याचा नाद जीवावर बेततो. एका चुकीमुळे त्या मुलाच्या जीवावर बेतू शकलं असतं. चिमुकल्याला अंघोळ घालताना साबणाच्या फेसातून आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे चिमुकल्याला अंघोळ घालणारे त्याच्या वडिलांनाही मोठा धक्का बसला आहे.
त्यांनी पाण्याने ही आग विझवली मात्र चिमुकला यामध्ये जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात उपचारासाठ दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
ऑस्करच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार ते आपल्या मुलाला बाथरूममध्ये अंघोळ घालत होते. त्या वजेट बाथरूममध्ये काही मेणबत्त्या देखील लावण्यात आल्या होत्या. ऑस्कर खूप आनंदाने आंघोळ करत होता. अचानक त्याच्या शरीरात साबणापासून तयार झालेले फेस मेणबत्तीच्या संपर्कात आला. त्यामुळे फोममध्ये आग लागली. या आगीमध्ये ऑस्कर होरपळला. ऑस्करच्या वडिलांनी साबण कंपनीला या घटनेसाठी जबाबदार धरलं. त्यांनी साबण कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी कंपनीकडून अजून कोणतंही स्पष्टीकरण आलं नाही.