मुंबई : जगात कोरोनाचं थैमान थांबत नाहीये. चीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या कोरोनाने संपूर्ण जगाला वेढले आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, जगभरात एकूण 18,46,963 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर आतापर्यंत 1,14,185 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत कोरोना संक्रमणाची संख्या झपाट्याने वाढली आहे आणि आता मृत्यूच्या बाबतीत अमेरिकेने इटलीला मागे टाकलं आहे.
कोरोनाच्या महामारीपुढे सुपरपावर अमेरिका टिकू शकला नाही. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे जवळपास 1,514 लोकांचा बळी गेला आहे. अमेरिकेत 5,56,044 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि आतापर्यंत 22,020 लोक मरण पावले आहेत.
जगात कोरोना विषाणूमुळे इटलीमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि दररोज मृत्यूची संख्या वाढत आहे. वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार, इटलीमध्ये गेल्या 24 तासांत 431 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि कोरोना विषाणूमुळे इटलीमध्ये मृत्यूची संख्या 19,899 वर पोहोचली आहे. इटलीमध्ये कोरोना विषाणूमुळे पीडित लोकांची संख्या वाढून 1,56,363 झाली आहे.
स्पेनमध्ये 1,66,000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. युरोपियन देश स्पेनमध्ये कोरोना संसर्ग खूप वेगाने वाढला आहे. स्पेनमधील मृतांचा आकडा 17,209 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे स्पेनमध्ये 303 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 3804 नवीन रुग्णांची नोंद झाली असून संक्रमित लोकांची एकूण संख्या 1,66,831 पर्यंत पोहोचली आहे.
अमेरिका - 22,020
इटली - 19,899
स्पेन - 17,209
फ्रान्स - 14,393
ब्रिटन - 10,612
इराण - 4,474
चीन - 3,341
बेल्जियम - 3,600
जर्मनी - 3,022
नेदरलँड्स - 2,737
ब्राझील - 1,223
तुर्की - 1,198
स्वित्झर्लंड - 1,106
स्वीडन - 899
पोर्तुगाल - 504
इंडोनेशिया - 373
ऑस्ट्रिया - 350
आयर्लंड - 334
रोमानिया - 316
भारत - 308