दर महिन्याला पिरीयड्सची तारीख बदलतेय? पण का...जाणून घ्या

जर तुमच्या मासिक पाळीच्या तारखा वेळोवेळी बदलत असतील आणि अनियमित मासिक पाळी येत असेल तर त्यामागे काही कारणं असू शकतात.

Updated: Feb 27, 2022, 03:44 PM IST
दर महिन्याला पिरीयड्सची तारीख बदलतेय? पण का...जाणून घ्या title=

मुंबई : मासिक पाळीचं चक्र हे अनेक कारणांमुळे बदलू शकतं. मासिक पाळीच्या सायकलचा कालावधी मासिक पाळीची लक्षणे बदलू शकतात. अनियमित मासिक पाळी येण्याचं मुख्य कारण म्हणजे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सच्या पातळीत असंतुलन होणं. त्यामुळे जर तुमच्या मासिक पाळीच्या तारखा वेळोवेळी बदलत असतील आणि अनियमित मासिक पाळी येत असेल तर त्यामागे काही कारणं असू शकतात.

मासिक पाळीच्या तारखा बदलण्याचं कारण

गर्भनिरोधक काही औषधं

गर्भनिरोधक पद्धती जसं की, आईयूडी, आपात्कालीन गर्भनिरोधक किंवा यासंबंधीच्या काही गोळ्यांमुळे हार्मोन्सच्या पातळी असंतुलन निर्माण होतं. यामुळे मासिक पाळीच्या सायकलमध्ये बदल होतात.

आरोग्याची परिस्थिती

पॉलीसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम, गर्भाशयातील फायब्रॉईड्स, एंडोमेट्रियोसिस, पेल्विक इंफ्लेमेटरी डिसिज, अंडर किंवा ओवरएक्टिव थायरॉयड अशा समस्या असलेल्या महिलांच्या पिरीयडसच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतात.

जीवनशैलीतील बदल

जर तुमच्या वजनात अचानक वाढ होत असेल किंवा ते कमी होत असेल तर याचा तुमच्या मासिक पाळीवर परिणाम करू शकतो. व्यायामामध्ये होणारा बदल, वाढलेला ताण, दारू पिणं किंवा सिगारेट ओढणं यामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते.