मुंबई : गर्भधारणेच्या वेळी महिलांच्या शरीरात अनेक मोठे बदल होत असतात. यामध्ये महिलांना जाणवणारा एक बदल म्हणजे गर्भधारणेदरम्यान योनीमार्गात खाज सुटणं आणि जळजळ होणं. यामागचे कारण म्हणजे योनीतून द्रवपदार्थाचा जास्त प्रमाणात होणारा डिस्चार्ज.
योनीमार्गातून होणाऱ्या डिस्चार्जचं प्रमाण ज्यावेळी वाढतं तेव्हा पीएच पातळी देखील वाढू शकते. परिणामी यामुळे इन्फेक्शन होण्याची समस्या उद्भवू शकते. मात्र, यामागे इतरही अनेक कारणं असू शकतात. आणि प्रत्येक महिलेला ही कारणं माहिती असणं खूप गरजेचं आहे.