Women Health: प्रसूतीनंतर घातलेल्या टाक्यांना सूज का येते?

सी सेक्शननंतर घातलेल्या टाक्यांची योग्य पद्धतीने काळजी घेतली नाही तर इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.

Updated: Feb 28, 2022, 02:14 PM IST
Women Health: प्रसूतीनंतर घातलेल्या टाक्यांना सूज का येते? title=

मुंबई : प्रसूतीनंतर म्हणा किंवा सी सेक्शननंतर प्रत्येक महिलेच्या शरीरात विविध बदल होतात. यामध्ये अधिक महिलांना एक त्रास जाणवतो तो म्हणजे प्रसूतीनंतर घातलेल्या टाक्यांना सूज येणं. प्रामुख्याने सी सेक्शन म्हणजेच सिझेरियननंतर ही समस्या अधिक महिलांना या तक्रारीला सामोरं जावं लागतं. सी सेक्शननंतर घातलेल्या टाक्यांची योग्य पद्धतीने काळजी घेतली नाही तर इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. 

यावेळी इन्फेक्शनसोबत महिलांना टाक्यांना सूज येण्याचीही समस्या असते. ज्यावेळी अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा महिलांना गंभीर त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. यासाठी महिलांनी जाणून घ्यावं की प्रसूतीनंतर घातलेल्या टाक्यांना सूज का येते. 

सिझेरियन डिलीव्हरीनंतर टाक्यांना का सूज येते?

सिझेरीयन डिवीव्हरीमध्ये टाके नायलॉनच्या स्टेपलने घातले जातात. अशामध्ये इन्फेक्शन होण्याचा अधिक धोका असतो. यासाठी डॉक्टर पॉलीग्लाइकोलाइड टाके घालण्याचा सल्ला देतात. याशिवाय लठ्ठपणा, सिझेरियनच्या वेळी अधिक रक्तस्त्राव, अँटिबायोटिक्स औषधं, टाक्यांची वेळेवर तपासणी न करणं, स्टेरॉइड औषधांचा जास्त वापर यामुळेही सूज येण्याची शक्यता असते.

टाके सूजू नये म्हणून काय करावं?

  • टाके घातलेल्या ठिकाणी कॉस्‍मेटिक प्रोडक्ट्सचा वापर करू नये
  • टाके असल्यावर अंघोळ करताना काळजी घ्यावी
  • खाज आल्यास टाक्यांना नखांनी खाजवू नये
  • कपड्यांना वारंवार बदलत रहा
  • टाके घातलेल्या ठिकाणी बर्फाने शेक द्या