'कडुलिंबाला आला कसा गोड पाला ?' अशी आहे कहाणी

 साई या झाडाखाली आराम करत असं म्हटलं जात. त्या झाडाची पान गोड कशी हे साऱ्या जगासाठी रहस्य आहे. 

Updated: Mar 22, 2018, 11:50 AM IST
 'कडुलिंबाला आला कसा गोड पाला ?' अशी आहे कहाणी  title=

शिर्डी : शिर्डीच्या साईंचे भक्त केवळ केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात पाहायला मिळतात. साईंवरील श्रद्धेमुळे अनेकजण साई संस्थानला लाखोंचे दान देत असतात. ते भारतीय गुरू, योगी आणि फकिर होते त्यांना संत म्हटले जायचे. मंदिरांमध्ये साईंना पुजले जाते. साईंचे जन्म आणि वास्तविकता याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या घर किंवा सख्या नातेवाईकांबद्दलही माहिती समोर आली नाही. त्यांना कोणी वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारल्यास ते तो प्रश्न टाळत असत. १६ वर्षाचे असताना ते अहमदनगर येथे आले. त्यानंतर त्यांचे नाव साई ठेवण्यात आले. 

लिंबाखाली समाधी 

 साईंच्या भक्तांनी शिर्डीत साई मंदिर स्थापन केलं. त्यांच आयुष्य सरळ होतं. काहींच म्हणण होत की ते मुस्लिम होत.

पण जाणकार सांगतात त्यानुसार ते मुस्लिम भिक्षुकांसोबत राहायचे. साईंच मंदिर जिथे आहे त्याठिकाणी लिंबाच झाड आहे. साई या झाडाखाली आराम करत असं म्हटलं जात. त्या झाडाची पान गोड कशी हे साऱ्या जगासाठी रहस्य आहे. 

कडुलिंबाचे गोड पान 

 लिंबाच्या झाडाची पान कडु असतात पण साईंच्या मृत्यूनंतर त्यांना या ठिकाणी दफन करण्यात आलं.

त्यानंतर या झाडाची पान गोड झाल्याचे म्हटले जाते. इथे येणारे भाविक या झाडाची पान खातात किंवा घरी घेऊन जातात.या झाडाची पान खाल्ल्याने अनेक आजार नष्ट होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.