मुंबई : प्रेमात पडलेल्या माणसाला आजुबाजूला काय चाललंय हे दिसतं नाही. म्हणूनच कदाचित प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. प्रेमाला कोणाची पर्वा नसते. प्रेमात लोकं एवढी वेडी होतात की आपण काय करतोय हेच त्यातल्या बऱ्याच जणांना कळत नाही. काही गंमतीशीर गोष्टी वाचूया ज्या प्रेमाच्या दिवसात कपल्स करतात. कालांतराने हे खूप बाष्कळपणाचंही वाटत पण त्या त्या वयात हे होतंच...जाणून घेऊया याबद्दल...
नवं नवं प्रेम झाल्यावर एकमेकांना नावाने हाकं मारणं शक्यतो टाळलं जातं. त्याऐवजी टोपण नावाचा वापर केला जातो. बाळा, सोन्या, बेबी, जानू, बेटा, छकुली अशी हाक मारून आपल्या प्रियकर / प्रेयसीला बोलावलं जातं. मोबाईल मेसेजपर्यंत असताना हे ठिक असतं पण चारचौघात अशी हाक आल्यास आजुबाजूवाल्यांच्या भुवया उंचावतात.
दोघांनी एकमेकांना समजून घेण्यात खरं प्रेम असतं. दोघांची प्रेमाची भाषा एकमेकांना कळते. त्याचा 'बाजार' किती करायचा हे ज्याचं त्याने ठरवायचं. अनेकजण आपल्या प्रेमाची प्रत्येक गोष्ट फेसबुक, इंस्टाग्रामवर शेअर करत असतात. आपण समोरच्यावर किती प्रेम करतो हे सोशल मीडियावर जाहीर केलं जातं. बऱ्याचदा त्यांच्या भावनांची खिल्लीही उडवली जाते.
आपल्या रिलेशनशीपला पहिला महिना, पहिलं वर्षे पूर्ण झाल्यावर, पहिल्या किसंचं सेलिब्रेशन केलं जातं. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना कदाचित याबद्दल सांगितलं नसेल पण तुम्ही सेलिब्रेशन तर केलं असेलंच.
सिनेसृष्टीचा सिनेमावर खूप मोठा प्रभाव असतो. त्यामुळे सिनेमातील एखाद्या सीनप्रमाणे प्रपोज करणं ही गोष्ट अनेक कपल्स करतात. एखाद्या पार्टीनंतर अचानक गुलाबाचं फुल देऊन प्रपोज करणं, गाणं म्हणून प्रपोज करणं यापैकी तुम्ही काय केलंय ? किंवा याव्यतिरिक्त तुम्ही काय केलंय का ?
नवं नवं प्रेम झालेले सर्वजण बेबी टॉक करताना दिसतात. आपली गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडसोबत लहान मुलांसारखं वागणं, हट्ट करणं, भांडणं, चावणं, रुसणं अशा गोष्टी करणारी अनेक कपल्स आपल्याला आजुबाजूला दिसतात.