मुंबई : फॅशन जेथून सुरु होते ते ब्रिटीश राजघराणे.
या राजघराण्यातील शाही लोक जे वस्त्र परिधान करतात ती होते फॅशन. राजघराण्यातील वस्त्रे हा नेहमीच फॅशन जगतात चर्चेचा विषय होतो. मग 91 वर्षीय राणी एलिझाबेथ असो की 4 वर्षीय राजकुमारी शार्लेट. फॅशनचा ट्रेंड या राजघराण्यातूनच सुरु होतो.
प्रिन्स विलियम आणि केट मिड 4 वर्षीय मुलगी प्रिन्सेस शार्लेट प्ले ग्रुपमध्ये जाउ लागली आहे. प्ले ग्रुपमध्ये जाताना केटनं आपल्या लेकीचे फोटो केटने काढले आणि चर्चा सुरु झाली तिच्या युनिफॉर्मची..लाखो रुपये किंमतीचा हा ड्रेस परिधान केल्यानंतर शेरलॉट झाली मिनि फॅशन आयकॉन. तिने घातलेला कोट, स्कार्फ, शुज या सर्वांचीच चर्चा सुरु झाली. अमाईया किड्स या फॅशन ब्रँण्डचे कपडे केट आपल्या मुलांसाठी खरेदी करते..... .
या घराण्यातल्या चार वर्षाच्या शार्लेपासून ते तिच्या 90 वर्षांच्या पणजीपर्यंत सगळ्यांचीच फॅशन फॉलो केली जाते...