मुंबई : रंगांचं एक जग आहे, रंगांशिवाय जीवन देखील रंगहीन वाटू लागतं, हेच रंग जीवनाला अर्थ प्राप्त करून देतात. रंगांचं वेगवेगळ्या विषयात महत्व आहे. अगदी डोळ्यांना शांती ते आरोग्यापासून, तर जे ज्योतिष मानतात त्यांच्यासाठी देखील रंगांचं एक वेगळेपण आहे, महत्व आहे. खालील माहितीत आपण जाणून घेऊ या, हिरव्या रंगाचं महत्व नेमकं आहे तरी काय, हिरव्या रंगाशिवाय निसर्ग अपूर्णच आहे, हे तर सर्वांना माहित आहे, पण आणखी अनेक गोष्टी आहेत खाली वाचा...
हिरवा रंग - एकांताचा निदर्शक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू, अस्थिर आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्याच तंद्रित राहणारी आणि तरीही बुद्धिप्रामण्यवादी असतात.
प्रदर्शनप्रियताही त्यांच्यापाशी असते, हिरव्या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होत असते. शास्त्रातही हिरव्या रंगाला महत्व आहे, तो शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचं प्रतिक देखील मानला जातो. जसे हिरवी साडी, बांगळ्यांचा हिरवा चुडा.
यासाठी सकाळी हिरवेगार वृक्ष, लतावेली किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने डोळ्यातील सूक्ष्म वाहिन्यांना शीतलता प्राप्त होते.
हिरवा रंग डोळ्यासाठी उत्तम आहे. हा रंग आपल्या मनालाही प्रसन्न करतो.
मानवाचे दैनंदिन जीवन आणि ज्योतिषात रंगांना खूप महत्त्व असते.
हिरवा - हा रंग बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार, रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देतो. विद्यार्थ्यांसाठी हा सर्वोत्तम रंग आहे.
रंगांच्या साहाय्याने उपचार
हिरवा : हा रंग कर्करोग, नपुंसकता, ताप तसेच कंबरदुखी दूर करतो. अल्सर तसेच गुप्तरोगांवरील उपचारांतही हा रंग लाभदायक आहे.
मिथुन आणि कन्या राशीला हिरवा रंग लाभदायक आणि लकी म्हणजेच शुभ असतो.