केंद्रीय पथक वेळेवर न आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान; राजू शेट्टींची टीका

केंद्रीय पाहणी पथक वेळेवर न आल्याने आता शेतकऱ्यांना मदत मिळणार कशी? असा सवाल शेट्टी यांनी केला आहे.

Updated: Oct 3, 2021, 08:23 AM IST
केंद्रीय पथक वेळेवर न आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान; राजू शेट्टींची टीका title=

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुन्हा केंद्र सरकारवर टीका केली आहे. दोन महिन्यांपूर्वी कोल्हापूरात आलेल्या पूरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. परंतु केंद्रीय पाहणी पथक वेळेवर न आल्याने आता शेतकऱ्यांना मदत मिळणार कशी? असा सवाल शेट्टी यांनी केला आहे.

कोल्हापूरात दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे महापूर आला होता. शिरोळ तालुक्याती महेश पाटील या शेतकऱ्यांचे यावेळी मोठे नुकसान झाले होते. 30 जुलै रोजी नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर राजू शेट्टी पोहचले असता. त्यांनी कोबीच्या पिकाचे संपूर्णतः झालेले नुकसान लोकांसमोर ठेवले होते. त्यावेळे त्यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी केली होती. 

परंतु महेश पाटील यांनी खचून न जाता. कोबीचे नुकसान झालेल्या पिकाचा कचरा बाहेर काढला आणि सोयाबिनची लागवड केली. त्यासाठी पुन्हा त्यांना 35 ते 40 हजाराचा खर्च आला. हे सोयाबिनचे पिक आज हिरवेगार आणि चांगल्या प्रकारे वाढले आहे. 

त्यामुळे राजू शेट्टी यांनी म्हटले की, दोन महिन्यापूर्वी संपूर्ण पिक उद्धस्त झालेल्या शेतकऱ्याने खचून न जाता पुन्हा नवीन पिकाची लागवड केली खरी. त्याला यशही मिळाले. परंतु महापूराच्या नुकसानीची पाहणी करणारे केंद्रीय पथक अद्यापही आलेले नाही. ते आता आले तर म्हणतील की, या शेतात नुकसान झालेलेच नाही. त्यामुळे केंद्रीय पथक लवकर न आल्याने. महेश सारख्या हजारो शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांची चेष्ठा का करताय? अशी टीका शेट्टी यांनी यावेळी केली.