कोल्हापूर : आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. मराठा आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयात नीट मांडणी करण्यात महाविकास आघाडी सरकार कमी पडले, हे त्यांचंच अपयश असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महाराष्ट्र सरकाने पारीत केलेला मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर वेळोवेळी सुनावनी घेण्यात आली . परंतु आज न्यायालयाने अंतिम निकाल दिला. मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यात अंधार निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द होणं हे महाविकास आघाडीचं अपयश आहे. न्यायालयाच्या सुनावण्यांना वकिल हजर नसणे, कागदपत्र उपलब्ध नसणे अशा बेजबाबदार पद्धतीने ही केस हातळण्यात आली. त्यामुळे ठाकरे सरकाने कोरोना आणि मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवावं. सर्वपक्षीय बैठक घ्यावी, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.