पुणे : खंडोबाची जेजुरी... सध्या पावसाच्या आगमनामुळे आणखीच सुंदर झालीय. जेजुरी परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्याआधी जोरदार वादळ झालं... वादळामुळे नाझरे धरणावर चक्रीवादळ पाहायला मिळालं. या चक्रीवादळात धरणातलं पाणी अक्षरशः हवेत खेचलं गेलं आणि हवेतच पाण्याचा एक सुंदर भोवरा तयार झाला. तर जेजुरी गडाच्या पायऱ्यांवरून पावसाच्या पाण्याचा धबधबाच वाहात होता. अमेरिकेच्या समुद्रामध्ये येणाऱ्या हरिकेन सायक्लोनसारख्या वादळी वा-याचा हा प्रकार असल्याची माहिती जाणकारांनी दिली.