पुणे: नाशिक आणि पुण्यात साथीच्या आजारांचे थैमान सुरु आहे. नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांचीही संख्या वाढताना दिसतेय. जानेवारी ते ऑगस्ट महिन्यात ११६४ रूग्णांपैकी ३३४ रूग्णांना डेंग्यूची लागण झाली.
ऑगस्ट महिन्याच्या २० दिवसांत ११४ रूग्ण आढळलेत. तर स्वाईन फ्लूने एका रुग्णाचा मृत्यू झालाय. तर पुण्यातही स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार पुण्यामध्ये स्वाईन फ्लूचे १६ रुग्ण आढळले असून त्यातील १० रुग्णांची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
सतत बदलणाऱ्या हवामानामुळे विषाणुजन्य रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये स्वाईन फ्लू सदृश लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.