Washim Accident: आयुष्यातील शेवटचा बस प्रवास ठरला; बस आणि ट्रकचा भीषण अपघात, चौघेजण जागीच ठार

 Washim Accident: वाशिम जिल्ह्यात ही अपघात झाला आहे. या अपघातात बसचा अक्षरशह: चेंदामेंदा झाला आहे. यावरुनच या अपघाताची तीव्रता लक्षात येते. 

वनिता कांबळे | Updated: May 9, 2023, 06:51 PM IST
Washim Accident: आयुष्यातील शेवटचा बस प्रवास ठरला; बस आणि ट्रकचा भीषण अपघात, चौघेजण जागीच ठार title=

Washim Accident News: खाजगी बस आणि ट्रक यांची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील चार प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर, 12 प्रवासी जखमी झाले आहेत. वाशिम जिल्ह्यात ही अपघात झाला आहे. या अपघातात बसचा अक्षरशह: चेंदामेंदा झाला आहे. यावरुनच या अपघाताची तीव्रता लक्षात येते. 

नागपूर - मुंबई मार्गावर झाला अपघात

नागपूर - मुंबई मार्गावरील वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील वडप फाट्याजवळ सोमवारी रात्री हा अपघात झाला आहे. एक ट्रक रस्त्यावर उभा होता. या ट्रकला भरधाव खाजगी बस धडक दिल्याने हा अपघात घडला. ही धडक इतकी जोरदार होती की बसचे मोठे नुकसान झाले आहे. बसच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला आहे. 

बस पुण्याला निघाली होती

या अपघातात चार प्रावशांचा मृत्यू झाला आहे.  ही खाजगी बस पुसद वरून पुण्याला निघाली होती. यावेळी या खासगी बसने मालेगाव तालुक्यातील वडप फाट्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरात धडकली. यात चार प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, 12 प्रवासी जखमी झाले आहेत.

या बस मध्ये एकूण 28 प्रवासी प्रवास करत होते. मंगेश शेषराव तिखे,अजय भारत शेलकर,दीपक सुरेश शेवाळे अक्षय प्रभू चव्हाण अशी मृत प्रवाशांची नावे आहेत.जखमीना वाशिम येथील शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास मालेगाव पोलीस करत आहेत. या अपघातामुळे खाजगी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे ऐरनीवर आला आहे.

परभणी गंगाखेड रोडवर कार आणि बाईकचा विचित्र अपघात, दोन ठार तिघे जखमी

परभणी गंगाखेड रोडवरील दैठणा परिसरात विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात दैठणा येथील दोघांचा मृत्यू झाला असून इतर तिघे जण जखमी आहेत. परभणी वरून गंगाखेड कडे निघालेल्या कार समोर अचानक एका धाब्यावरून मुख्य मार्गावर बाईक आली. बाईक आणि कारची धडक होऊन अपघात झाला. अनियंत्रित झालेल्या कारने गंगाखेड कडून ट्रिपल सीट येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरील दोघे जण या अपघातात ठार झाले आहेत. दीपक कच्छवे आणि विवेक नाईक अशी मृतांची नावे असून. तीन जखमी पैंकी पवन कच्छवे हा गंभीर जखमी आहे. गंभीर जखमी आणि दोघे मयत हे दैठणा येथील रहिवासी आहेत.