यवतमाळ : जिल्ह्यात मध्यप्रदेशमधून आणलेल्या १० देशी पिस्तुल पोलिसांनी जप्त केल्यानं खळबळ उडालीय. पोलीस दप्तरी अतिसंवेदशील म्हणून नोंद असलेल्या पूसदमध्ये विक्रीसाठी आलेल्या नऊ देशी पिस्तुल जप्त करून चार आरोपींना जेरबंद केलं. तर यवतमाळ शहरातून एक देशी पिस्तुल जप्त करून तीन आरोपींना अटक करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिनस्त टोळी विरोधी पथकानं ही कामगिरी केली. पिंटू जगताप, जय बाबर, राकेश बयास आणि बबलू मळघणे आरोपींची नावं आहेत. आरोपी पिंटू जगतापनं पूसद शहरात देशी बनावटीच्या पिस्टल विक्री केल्या होत्या. त्यानंतर परत तो पिस्तुल विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पूसदमध्ये सापळा रचला. पिस्तुल विक्रीचा व्यवहार सुरु असतानाच पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली.