Video: नागपूरकर डॉली चहावाल्याच्या टपरीवर पोहोचले बिल गेट्स; म्हणाले, 'भारतात..'

Bill Gates Enjoy Cutting Chai in Nagpur: जगातील सर्वात यशस्वी आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनीच या चहावाल्याकडे चहा प्यायला गेल्याचा व्हिडीओ पोस्ट करत आश्चर्याचा धक्का दिला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 29, 2024, 11:14 AM IST
Video: नागपूरकर डॉली चहावाल्याच्या टपरीवर पोहोचले बिल गेट्स; म्हणाले, 'भारतात..' title=
गेट्स यांनी सोशल मीडियावरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे

Bill Gates Enjoy Cutting Chai in Nagpur: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात यशस्वी कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. बिल गेट्स यांनी बुधवारी आपल्या इन्स्टाग्रामवरुन नागपूरमधील एका चहावाल्याच्या टपरीवरील व्हिडीओ शेअर केला आहे. नागपूरमध्ये हा चहावाला 'डॉली चायवाला' म्हणून प्रसिद्ध आहे. हा व्हिडीओ शेअर करत बिल गेट्स यांनी भारतामध्ये प्रत्येक गोष्टीत वेगळेपणा दिसून येतो असं म्हणत भारतीयांमधील वेगळेपण शोधण्याच्या कौशल्याचं कौतुक केलं आहे.

अब्जाधीस बिल गेट्स यांनी घेतला टपरीवरील कटींगचा आनंद

अब्जाधीश असलेले बिल गेट्स सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. बिल गेट्स यांनी 'डॉली चायवाला'च्या टपरीवर कटींग चहाचा आनंद घेतला.  'एक चहा प्लीज' अशा कॅप्शनसहीत आपल्या या टपरीवरील भेटीचा व्हिडीओ गेट्स यांनी शेअर केला आहे. बिल गेट्स हे निळ्या रंगाचं ब्लेझरमध्ये अगदी फॉरमल लूकमध्ये दिसत आहेत. त्यांच्या व्हिडीओला हजारोंच्या संख्येनं कमेंट्स आणि लाखोंच्या संख्येनं लाईक्स मिळाले आहेत. भारतीयांच्या तर या व्हिडीओवर उड्याच पडल्याचं कमेंट सेक्शनमध्ये दिसत आहे. तर डॉली चायवाला हा गॉगल लावून हिरव्या रंगाच्या शर्ट आणि व्रेस्ट जॅकेटमध्ये दिसत आहे.

भारतीयांवर कौतुकाचा वर्षाव

"भारतामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीत वेगळेपणा आणि संशोधनात्मक दृष्टीकोन दिसून येईल. अगदी साधा चहा बनवण्यामध्येही इथे वेगळेपण दिसून येतं," अशा कॅप्शनसहीत बिल गेट्स यांनी नागपूरमधील चहावाल्याच्या टपरीवर चहाचा आनंद घेतानाच व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओमध्ये लिहिलेल्या मजकुरात, 'भारतात परत येऊन मी फार उत्साही आहे. हा देश भन्नाट संशोधनांसाठी प्रसिद्ध आहे. अधिक जीव वाचवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहोत. अशा अनेक चाय पे चर्चांसाठी मी उत्सुक आहे,' असं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे.

नक्की पाहा >> Video: ..अन् मुकेश अंबानी गावकऱ्यांसमोर हात जोडून उभे राहिले; स्वत: जेवण वाढलं

भारतीयांकडून कमेंट्सचा पाऊस

बिल गेट्स यांनी शेअर केलेल्या व्हिडीओखाली अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्यात. एकाने हा फार लकी चहावाला आहे ज्याच्याकडे चक्क बिल गेट्स चहा प्यायला आले, असं म्हटलं आहे. स्वीगी इंडियाच्या इन्साट्ग्राम अकाऊंटवरुनही 'बिल कीती झालं?' असा प्रश्न विचारण्यात आला आहे. तुम्हीच पाहा बिल गेट्स यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ...

कोण आहे हा चहावाला?

नागपूरमधील सदर परिसरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जुन्या मैदानावजळ डॉल चायवाल्याची चहाची गाडी आहे. डॉली चायवाल्याचं खरं नाव नेमकं काय आहे याबद्दलची माहिती ठाऊक नाही. मात्र तो नागपूरकरांमध्ये आणि सोशल मीडियावर डॉली चायवाला म्हणून प्रसिद्ध आहे. चहा बनवताना अगदी दूध पातेल्यात ओतण्यापासून ते चहा बनवण्याच्या पद्धतीपर्यंत त्याच्या शैलीचं कौतुक होत असतं. मात्र हा व्हिडीओ नागपूरमध्ये शूट करण्यात आला आहे की अन्य कोणत्या जागी हे स्पष्ट झालेलं ाही.