Yamaha R15 V3 बाईकचं बुकिंग सुरू, इतक्या रूपयात करा बुकिंग

ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये यावर्षी अनेक नवीन बाईक लॉन्च होणार आहेत. यातीलच एक आहे यामाहा आर१५ व्ही३.० बाईक. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Jan 30, 2018, 01:16 PM IST
Yamaha R15 V3 बाईकचं बुकिंग सुरू, इतक्या रूपयात करा बुकिंग title=

नवी दिल्ली : ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये यावर्षी अनेक नवीन बाईक लॉन्च होणार आहेत. यातीलच एक आहे यामाहा आर१५ व्ही३.० बाईक. 

५ हजारात बुकिंग?

यामाहाची ही नवीन बाईक लोकल डिलरकडे तुम्ही बुक करू शकता. मीडिया रिपोर्टनुसार, या बाईकला ५ हजार रूपयांचं टोकन देऊन बुक केलं जाऊ शकतं. पण बुकिंगबाबत अजून काही ऑफिशिअल माहिती समोर आलेली नाही. 

काय नसेल बाईकमध्ये?

फेब्रुवारीमध्ये ऑटो एक्स्पोमध्ये ही बाईक लॉन्चसाठी तयार आहे. लॉन्चनंतर Yamaha R15 V3 ची डिलिव्हरी सुरू होण्याची अपेक्षा आहे. भारतात उपलब्ध होणा-या या बाईक मॉडलमध्ये इंटरनॅशनल मॉडच्या तुलनेत काही कमी टेक गॅझेट्स आणि हार्डवेअर असतील. जसे की यात अपसाईड डाऊन फॉर्क्सच्या ऎवजी रेग्युलर फॉर्क्स दिले जातील. त्यासोबतच भारतीय मॉडलमध्ये एबीएस म्हणजे अ‍ॅंटी लॉकिंग सिस्टम सुद्धा नसेल. तसेच या स्लिपर क्लच सुद्धा देण्यात आलेलं नाही. 

किती असेल किंमत?

भारतात यामाहाची ही नवीन बाईक Yamaha R15 V2 ला रिप्लेस करेल. या नवीन बाईकची किंमतही १.२ लाख रूपये इतकी असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

काय असेल खासियत?

Yamaha R15 V3.0 मध्ये १५५.१ सीसीचं सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड, फ्यूल इंजेक्टेड इंजिन असेल. हे इंजिन १९ बीएचपीची पॉवर आणि १४.७ न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. या इंजिनमध्ये ६ स्पीड गिअरबॉक्सही देण्यात आलाय.