Worlds Smallest Car:ऑटोमोबाइल (Automobile) सेक्टर फार वेगाने वाढत आहे. छोट्या कार्सबरोबरच हॅचबॅक (Hatchback) आणि एसयूव्ही (SUV) सेगमेंटच्या गाड्यांना दिवसोंदिवस मागणी वाढताना दिसत आहे. याचा परिणाम या गाड्यांच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याच्या माध्यमातून दिसून येत आहे. मात्र गाड्या विकत घेणाऱ्यांपैकी एक मोठा गट असाही आहे की जे शहरामध्येच गाड्या चालवण्यासाठी छोट्या आकाराच्या गाड्यांना पसंती देतात. त्यामुळेच टाटा नॅनो, बजाज क्यूट आणि पीएमव्ही ईएएस ई सारख्या कार्सलाही चांगली मागणी आहे.
एकीकडे लहान आकारच्या गाड्यांना पसंती वाढत असतानाच आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जगातील सर्वात छोट्या आकाराची कार कोणती? खरं तर या प्रशनाचं उत्तर नॅनो ही नाही, क्यूटही नाही. या गाडीचं नाव आङे पील पी50. ही गाडी केवळ 1.3 मीटर लांबीची आहे. या गाडीमध्ये केवळ एकच व्यक्ती बसू शकते.
या गाडीला पील नावाच्या कंपनीने बनवलं आहे. ही गाजी एलेक्स ऑर्चिन यांनी डिझाइन केलेली आहे. कारची रुंदी 98 सेंटीमीटर इतकी आहे. तर उंची 100 सेंटीमीटर इतकी आहे. कारचं वजन 59 किलो इतकं आहे. या आकारामुळे 2010 साली या गाडीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात छोटी कार म्हणून नोंद झाली आहे.
पील पी 50 मध्ये मोपेडपेक्षाही छोट्या आकाराचं इंजिन आहे. अर्थात या गाडीचा आकार पाहता हे इंजिन अगदीच उत्तम प्रकारे काम करतं. पीलमध्ये 49 सीसीचं टू स्ट्रोक इंजिन आहे. हे इंजिन 4.2 बीएचपीची पॉवर आणि 5 एनएम टॉर्क निर्माण करते. या कारमध्ये 3 स्पीड मॅन्युएल गेअर बॉक्स आहे. कारची टॉप स्पीड 61 किमी प्रति तास इतकी आहे. तर कारचं मायलेज 80 किमी प्रति लीटर इतकं आहे.
या कारची रचना अशाप्रकारे डिझाइन करण्यात आली आहे की तिचं वजन फारच हलकं आहे. कारची बॉडी मोनोकॉन फायबर ग्लासपासून बनवली आहे. फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये दोन पॅडलबरोबरच एक कंट्रोलिंग व्हील, गेअर शिफ्टर आणि स्पीडोमीटर आहे. याशिवाय कारमध्ये इतर कोणतेही फिचर्स नाहीत.
पी 50 ची निर्मिती पहिल्यांदा 1965 साली करण्यात आली होती. त्यानंतर 2010 साली पुन्हा या गाडीची निर्मिती करुन ती बाजारात उतरवण्यात आली. आता पी 50 ची निर्मिती लंडनमध्ये केली हाते. कंपनी या कारचं इलेक्ट्रॉनिक व्हेरिएंट लॉन्च करणार आहे. या कारची किंमत 84 लाख रुपये इतकी आहे. तसेच या गाडीचं इलेक्ट्रिक व्हर्जन ई 50 ला युरोपियन बाजारपेठेमध्ये फारच पसंती मिळाली आहे.