धक्कादायक! ऍपल प्रॉडक्ट्स इतके महाग का? नेमका खर्च लागतो किती आणि विकतात कितीला?

तुम्ही कधी विचार केला आहे की नक्की एक ऍपल प्रोडक्ट बनवायला किती खर्च येतो?

Updated: Mar 31, 2021, 09:52 PM IST
धक्कादायक! ऍपल प्रॉडक्ट्स इतके महाग का? नेमका खर्च लागतो किती आणि विकतात कितीला? title=

मुंबई : iphone7 आणि iphone7plus 2016 मध्ये जेव्हा लॅान्च झालं, तेव्हा त्याची किंमत 47 हजार रुपये होती. तर त्याच्या प्रिमियम मॅाडलची किंमत 56 हजार रुपये होती. जेव्हा 2020 मध्ये iphone12 लॅान्च झाला तेव्हा त्याची किंमत 60 हजार रुपये होती, आणि त्याच्या प्रिमियम मॅाडलची किंमत 80 हजार रुपये इतकी होती. परंतु Excise duty आणि GST मुळे या फोनची किंमत भारतात येईपर्यंत 70 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत होते.

तुम्ही कधी विचार केला आहे की नक्की एक ऍपल प्रोडक्ट बनवायला किती खर्च येतो?
जर iphone 12 pro चा विषयी सांगायचं झालं तर त्याचे बिल ऑफ मटेरीअल, 30 हजार रुपये इतकी आहे. पण हा फोन अमेरिकेत 999$ म्हणजेच 73 हजार पर्यंत आणि भारतात 1 लाख 19 हजारां पर्यंत विकला जातो. तसेच ऍपल वॅाच बद्दल सांगायचे झाले तर याच्या बिल ऑफ मटेरीअलपेक्षा त्याची रीटेल प्राइझ ही 24% जास्त आहे.

ऍपल जर इतक्या जास्त प्रमाणात प्रोडक्टवर पैसे लावत आहे, तरी देखील लोकं का ऍपल प्रोडक्ट घेतात? असा प्रश्न तुम्हाला पडला असणार. तर या मागचे अनेक कारणे समोर आले आहेत. त्यांपैकी पहिलं कारण म्हणजे Brand loyalty, लोकं ऍपल प्रोडक्ट्सला लग्जरी वस्तू म्हणून पाहतात आणि विकत घेतात. जसे तुम्ही Gucci आणि chanel चे लाखो रुपयांचे Hand bag स्टेटस सिम्बॅाल म्हणून विकत घेतात, त्याचप्रमाणे लोक ऍपल चे प्रोडक्ट्स विकत घेतात.

त्या मागचं दुसरं कारण हे आहे की, ज्या लोकांकडे आधीपासूनच ऍपल प्रोडक्ट्स आहेत, अशा लोकांना आता ते प्रोडक्ट्स वापरण्याची सवय लागली आहे. अशात मग ते कंपनीने कितीही प्रोडक्ट्स महाग केले तरी तेच विकत घेतात.

ऍपल 2 Trillion dollars च्या मार्केच कॅपिटल पर्यंत पोहचणारी पहिली कंपनी आहे. जितके पैसे या कंपनीकडे आहेत, ते इटली, ब्राझील आणि कॅनडा या देशांच्या वार्षीक GDP पेक्षा ही जास्त आहे.

मागील काही वर्षांपासून लोकं आपला फोन लवकर बदलत नाहीत, त्यामुळे ऍपल्स चे प्रोडक्ट्स पहिल्यासारखे विकले जात नाहीत. म्हणून मग कंपनीने ग्रोथ आणि प्रोफिट मार्जीन वाढवण्यासाठी प्रोडक्ट्सला महाग केलं आहे.