मुंबई : इंस्टंट मॅसेजिंग ऍप असलेल्या WhatsApp मध्ये नवं फीचर येत आहे. या फीचरमुळे मोबाईलमधील मेमेरी वाचण्यास मदत होणार आहे. या फीचरद्वारे कंपनीने व्हॉट्सऍपच्या स्टोरेज सेक्शनला रिवँप केलं आहे.
WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सऍप आपल्या स्टोरेज सेक्शनमध्ये काम करत आहे. या सेक्शनमध्ये कंपनी नवीन युझर इंटरफेस घेऊन येत आहे. यातून युझरला त्याच्या व्हॉट्सऍपकरता किती मेमरी वापरली जात आहे. याची माहिती मिळणार. यामुळे युझर आपल्या मेमरीचा योग्य वापर करू शकतो.
रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सऍपच्या नवीन स्टोरेज युझर इंटरफेसमध्ये वेगवेगळ्या साइजच्या फाइलला सेक्शन देण्यात येणार आहे. यामुळे कोणत्या कॉन्टेंटला जास्त स्पेसची गरज आहे. याची माहिती कळू शकेल.
नवीन स्टोरेज युझर इंटरफेन्समध्ये टॉपमध्ये एक बार असेल जो स्टोरेज कुठे सर्वाधिक वापरला जात आहे, याची माहिती देईल. नवीन सेक्शन देण्यात आलं आहे जिथे याची माहिती देण्यात येईल.