Whatsapp New Feature Undo : जगप्रसिद्ध सोशल मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नवीन फिचर (Whatsapp New Feature) आणले आहे. या नवीन फीचरचा लाखो-करोडो युझर्सना मोठा फायदा होणार आहे. नवीन फीचरनुसार आता य़ुझर्सना डिलीट केलेला मेसेज पुन्हा मिळवता येणार आहे. त्यामुळे ज्या युझर्सचे मेसेज चुकून डिलीट व्हायचे त्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
व्हॉट्सअॅप (Whatsapp) युझर्ससाठी दरवेळी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतो. असेच नवीन फीचर आता व्हॉट्सअॅप घेऊन आला आहे. अनेकवेळा युझर्सकडून चुकुन एखादा मेसेज डिलीट होतो. हा मेसेज डिलीट झाल्यानंतर तो पुन्हा मिळवता येत नाही. त्यामुळे युझर्सची मोठी पंचाईत होती. हीच गोष्ट लक्षात घेऊन व्हॉट्सअॅप युझर्ससाठी नवीन फीचर घेऊन आला आहे.
व्हॉट्सअॅपचे (Whatsapp) नवीन फीचर डिलीट केलेला मेसेज परत मिळवण्याची सुविधा देते. हे मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या एमएस वर्डमध्ये वापरल्या जाणार्या 'UNDO' पर्यायाप्रमाणे वापरले जाऊ शकते. व्हॉट्सअॅपने हे फीचर फक्त 'Delet For Me' पर्यायासाठी आणले आहे. यानुसार आता युझर्स त्यांनी डिलीट केलेला मेसेज पुन्हा मिळवू शकता. कंपनीने ट्विटरवरील आपल्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विटद्वारे या नवीन फीचरची माहिती दिली आहे.
तुमच्याकडून जर एखादा मेसेज डिलीट झाला तर Delet केल्यानंतर UNDO चा हा पर्याय फक्त 5 सेकंदांसाठी वापरता येतो. यापेक्षा जास्त असल्यास तुम्हाला UNDO पर्याय दिसणार नाही.एखादा मेसेज डिलीट करताना तुम्ही Delete For Everyone ऐवजी Delete for Me या पर्यायाने डिलीट केला असेल, तर तुम्ही या पर्यायाद्वारे 5 सेकंदात तो पूर्ववत करून तो पुन्हा रिकव्हर करू शकाल. यानंतर तो मेसेज पुन्हा पाहून तुम्ही मेसेज सेव्ह करायचा की हटवायचा हे ठरवू शकता.
"Delete for Me"
We've all been there, but now you can UNDO when you accidentally delete a message for you that you meant to delete for everyone! pic.twitter.com/wWgJ3JRc2r
— WhatsApp (@WhatsApp) December 19, 2022
व्हॉट्सअॅपच्या (Whatsapp) नवीन UNDO फीचरचा सर्वाधिक फायदा अशा युझर्सना होणार आहे, ज्यांना व्हॉट्सअॅपवरून ग्रुपमधील मेसेज डिलीट करायचा आहे, परंतु चुकून Delete for Me या पर्यायावर क्लिक केले आहे. त्यामुळे तो मेसेज स्वत:च्या मोबाईलवरून गायब होतो, पण इतरांच्या मोबाइलमध्ये सेव्ह राहतो. असी चुक झाल्यास युझर्स तो मेसेज या पर्यायाद्वारे पुन्हा मिळवू शकतात.
दरम्य़ान व्हॉट्सअॅपने (Whatsapp) 2017 मध्ये Delete For Everyone हे फीचर आणले होते. यापूर्वी हे फीचर मेसेज पोस्ट केल्यानंतर केवळ 7 मिनिटांच्या आत वापरता येत होते. नंतर ही वेळ वाढवून ६० तास करण्यात आली होती. त्यात आता नवीन फिचरनुसार डिलीट केलेले मेसेज पुन्हा मिळवता येणार आहे.त्यामुळे य़ुझर्सना याचा मोठा फायदा होणार आहे.