Whatsapp वर आता चॅटिंगची मजा आणखी वाढणार, पाहा 5 अपडेट फीचर्स

आता Whatsapp वर मिळणार जास्तीचे फीचर्स, पाहा काय होणार तुमच्या आयुष्यात बदल

Updated: Jun 3, 2022, 07:01 PM IST
Whatsapp वर आता चॅटिंगची मजा आणखी वाढणार, पाहा 5 अपडेट फीचर्स title=

मुंबई : Whatsapp वापरकर्त्यांसाठी अधिक नवीन फीचर्स लाँच होणार आहेत. त्यामुळे चॅटिंगचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीनं लुटता येणार आहे. आता फोटो, व्हिडीओ आणि चॅटिंगसाठी अधिक चांगले फीचर्स लवकरच युजर्सना मिळणार आहेत. याशिवाय रिअॅक्शन फीचरमध्ये रिप्लाय देखील करता येणार आहे. 

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार सध्या नवीन 5 फीचर्स ही बीटा व्हर्जनमध्ये टेस्ट केली जात आहेत. इमोजी रिअॅक्शन अधिक चांगली करण्यासाठी Whatsapp काम करत आहे. 

याशिवाय यूजर्सना टेक्स्ट मेसेज एडिट करणे, कव्हर फोटो लावणे आणि स्टेटसवर रिप्लाय इंडिकेटर असे अनेक नवीन पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहेत. 

आतापर्यंत तुम्ही फक्त व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज डिलीट करू शकत होता. आता चूक लहान असेल तर लोक स्टार लावून दुसरा मेसेज पाठवतात किंवा तो मेसेज डिलीट करतात. लवकरच तुम्हाला प्लॅटफॉर्मवर मेसेज एडिट करण्याचा पर्यायही उपलब्ध होणार आहे. तुम्ही तुमचा पाठवलेला मेसेज एडिट करू शकता. हे फीचर अँड्रॉइड, iOS आणि डेस्कटॉप या तिन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे.

तुम्ही तुमच्या फेसबुकला ज्या प्रमाणे कव्हर फोटो अॅड करता. त्याच प्रमाणे आता Whatsapp वर कव्हर फोटोचा पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे. हे फीचर Whatsapp डेस्कटॉपसाठी उपलब्ध असणार आहे. डेस्कटॉपसाठी Whatsap वर कव्हर फोटो आणि प्रोफाईल फोटो अशा दोन्ही गोष्टी दिसणार आहेत. 

तुमच्या स्टेटसला कोणी रिप्लाय करत असेल तर नोटिफिकेशन मेसेजसारखं दिसतं. लवकरच यामध्येही बदल केला जाणार आहे. कंपनीकडून स्टेटसला केलेल्या रिप्लायवर वेगळा इंडिकेटर देण्याचं काम सुरू आहे. सध्या हे फीचर बीटा व्हर्जनमध्ये टेस्ट केलं जात असून लवकरच सगळ्यांसाठी उपलब्ध होईल.  

आता तुम्ही मेसेजवर रिअॅक्शन देऊ शकता. मात्र त्यावरही आता कंपनी अजून एक अॅडव्हान्स फीचर डेव्हलप करत आहे. बीटा व्हार्जन इमोजी रिप्लाय देण्याचा पर्याय अधिक उपलब्ध होणार आहे.  

बीटा व्हर्जनमध्ये कंपनी डिटेल रिएक्शनवर काम करत आहे. फोटो अल्बमवर दिलेल्या रिअॅक्शनवर काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे हे फीचर लवकरच तुमच्या फोनवर उपलब्ध होऊ शकतं.