जिओ फोन वापरणाऱ्यांसाठी खुशखबर, कंपनीनं सुरु केली ही सेवा

रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे.

Updated: Sep 11, 2018, 05:51 PM IST
जिओ फोन वापरणाऱ्यांसाठी खुशखबर, कंपनीनं सुरु केली ही सेवा  title=

मुंबई : रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. जिओच्या दोन्ही मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅपची सेवा सुरु झाली आहे. जिओ फोनसाठी व्हॉट्सअॅपनं नवीन व्हर्जन तयार केलं आहे. हे व्हर्जन काय ऑपरेटिंग सिस्टीम (KaiOS)ला सपोर्ट करतं. व्हॉट्सअॅपचं हे नवीन व्हर्जन जिओ फोनमध्ये १० सप्टेंबरपासून उपलब्ध झालं आहे. २० डिसेंबरपासून जिओच्या सगळ्या फोनवर व्हॉट्सअॅप उपलब्ध होईल. भारतातले जिओचे कोट्यवधी ग्राहक आता व्हॉट्सअॅप वापरू शकतात, असं व्हॉट्सअॅपचे उपाध्यक्ष क्रिस डॅनियल यांनी सांगितलं.

जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅप डाऊनलोड करण्यासाठी आधी तुमचा प्लान पाहा. जर तुमच्या जिओ फोनचा प्लान संपला असेल तर इंटरनेट चालणार नाही. प्लान सुरु असेल तर इंटरनेट ऑन करा आणि व्हॉट्सअॅप डाऊनलोड करा.

जिओ फोनवर असं डाऊनलोड करा व्हॉट्सअॅप

-सगळ्यात आधी जिओ फोनमधल्या App Storeवर क्लिक करा 

- तुम्हाला फेसबूक, व्हॉट्सअॅप, युट्यूबसोबत व्हॉट्सअॅप दिसेल 

- व्हॉट्सअॅपसमोर असलेल्या डाऊनलोड लिंकवर क्लिक करा 

- व्हॉट्सअॅप डाऊनलोड केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून व्हॉट्सअॅप अॅक्टीव्ह करा 

- व्हॉट्सअॅप अॅक्टीव्ह झाल्यानंतर तुम्ही चॅटिंग करू शकाल

जिओ फोन २ लवकरच बाजारात

काहीच दिवसांपूर्वी जिओनं त्यांचा अपग्रेड व्हेरियंट जिओ फोन २ लॉन्च केला होता. हा फोनही लवकरच बाजारात येणार आहे. रिलायन्स जिओच्या बैठकीमध्ये याबाबतची घोषणा करण्यात आली होती. याच बैठकीत १५ ऑगस्टला जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरु होईल, असं सांगण्यात आलं होतं. पण व्हॉट्सअॅप सुरु व्हायला वेळ लागला.