WhatsApp चे प्रायव्हसीसाठी नवीन फीचर; अशी करा सेटिंग

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युर्जससाठी एक नवीन फीचर्स लॉन्च केले आहे. यामुळे तुमचे खासगी बोलणे आता सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे कोणाच्या हातात मोबाईल पडला तरी ते तुमचे WhatsApp Chat पाहू शकणार नाहीत.

सुरेंद्र गांगण | Updated: May 16, 2023, 03:02 PM IST
WhatsApp चे प्रायव्हसीसाठी नवीन फीचर; अशी करा सेटिंग title=

Whatsapp New Update :  व्हॉट्सअ‍ॅप हे एंड-टू-एंड इनस्क्रिप्टेड असले, तरी एखाद्या व्यक्तीला आपल्या फोनचा पासवर्ड मिळाला की त्याला तुमचे चॅट्स वाचता येत होते. मात्र, व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युर्जससाठी एक नवीन फीचर्स लॉन्च केले आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपचे चॅट कोणाला वाचता येणार नाही. ते सुरक्षित असणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स लॉक करण्याचे फीचर लॉन्च केल्याने तुमचे चॅट कोणाला वाचता येणार नाही. यामुळे तुमचे खासगी बोलणे आता सुरक्षित राहणार आहे. त्यामुळे कोणाच्या हातात तुमचा मोबाईल पडला तरी ते तुमचे WhatsApp Chat पाहू शकणार नाहीत.

WhatsApp ने 'चॅट लॉक' फीचर  

अ‍ॅपची गोपनीयता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने अखेर बहुप्रतिक्षित 'चॅट लॉक' फीचर आणले आहे. चॅट लॉकसह, तुम्ही आता तुमच्या खासगी संभाषणांमध्ये सुरक्षिततेचा अतिरिक्त स्तर जोडू शकता. त्यासाठी तुम्ही फक्त तुम्ही किंवा तुमच्या डिव्हाइसचा पासवर्ड किंवा बायोमेट्रिकचा अ‍ॅक्सेस असलेले कोणीतरी त्यात प्रवेश करु शकतात. हे वैशिष्ट्य विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त आहे जे त्यांचे फोन कुटुंबातील सदस्यांसह किंवा मित्रांसह देतात. त्यांच्यापासून तुमचे चॅट सुरक्षित राहणार आहे.

 मेटाने या फीचरची घोषणा केली आहे. यामुळे आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपमधील ठराविक चॅट्स लॉक करता येणार आहेत. त्यामुळे तुमचा फोन अनलॉक केला असला, तरीही तुम्ही लॉक केलेले चॅट्स इतर कोणीही वाचू शकणार नाही. विशेष म्हणजे हे फीचर (WhatsApp Chat Lock) ग्रुप आणि पर्सनल अशा दोन्ही प्रकारच्या चॅट्सना लागू होणार आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपच्या कोट्यवधी यूझर्सना या फीचरचा फायदा होणार आहे. यामुळे आपल्याला कंपनीचे महत्त्वाचे ग्रुप, किंवा महत्त्वाचे खासगी चॅट्स लॉक करून ठेवता येणार आहेत.

यानंतर लॉक केलेले चॅट उघडण्यासाठी तुम्ही डिव्हाईस पिन किंवा बायोमॅट्रिक लॉक, म्हणजेच फिंगरप्रिंट लॉक किंवा फेस लॉकचा वापर करु शकता. यामुळे तुमचा फोन दुसऱ्या व्यक्तीकडे असला, तरीही तुमच्या परवानगीशिवाय ती व्यक्ती तुमचे लॉक चॅट्स वाचू शकणार नाही. 

नवीन सेटिंग कशी करणार? । जाणून घ्या

- तुम्हाला हे नवीन अपडेट पाहिजे असल्यास आपले व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करावे लागेल.

- व्हॉट्सअ‍ॅपने हे फीचर आपल्या सर्व यूझर्ससाठी रोलआऊट केले आहे. येत्या काही दिवसांमध्ये ते सर्वांसाठी उपलब्ध होईल. 

- व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला काही सेटिंगमध्ये जाऊन बदल करावा लागेल.

- सर्वात आधी व्हॉट्सअ‍ॅप उघडा. त्यानंतर एखादे ग्रुप किंवा पर्सनल चॅट ओपन करा.

- यात सगळ्यात स्क्रोल करत गेल्यानंतर खाली तुम्हाला 'लॉक चॅट' (WhatsApp Chat Lock Feature) हा पर्याय दिसेल.

- यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड किंवा बायोमेट्रिक व्हेरिफाय करावे लागेल. यानंतर तुम्ही निवडलेले चॅट लॉक होईल.