Mobile बदलूनही Whats App चॅटस, पिक्चर्स आणि Video डिलीट होणार नाहीत; 'या' टीप्स वापरा

तुम्ही जर या टीप्स फॉलो केल्या तर तूमचे सर्व डेटा सुरक्षित राहणार आहेत. 

Updated: May 22, 2022, 04:23 PM IST
 Mobile बदलूनही Whats App चॅटस, पिक्चर्स आणि Video डिलीट होणार नाहीत; 'या' टीप्स वापरा  title=

मुंबई  : जगप्रसिद्ध सोशल मेसेजींग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप सध्या प्रत्येक फोनमध्ये मिळेल. असा एकही अॅड्राईड फोन मिळणार नाही, ज्यात व्हॉट्सअ‍ॅप नसेल. या व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सध्या सर्वच नागरीक आपल्या मित्र-मैत्रिणींशी गप्पा व बिझनेस करतायत. हेच व्हॉट्सअ‍ॅप जेव्हा आपण आपल्या नवीन फोनमध्ये चालू करतो, त्यावेळेस आपल्याला जूने चॅटस, पिक्चर व्हिडिओ सापडत नाही. मात्र तूम्ही जर या टीप्स फॉलो केल्या तर तूमचे सर्व डेटा सुरक्षित राहणार आहेत. हा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी जाणून घेऊयात या टीप्स...   

'या' टिप्स फॉलो करा  

तुमचे WhatsApp चॅट्स आणि मीडिया फाइल्स नेहमी सुरक्षित ठेवण्यासाठी, सर्वप्रथम Google Drive वर त्यांचा बॅकअप घेतल्याची खात्री करा. याच्या मदतीने फोन बदलल्यानंतरही तुम्हाला चॅट्स परत मिळतील.

व्हॉट्सअ‍ॅप डेटाचा बॅकअप घेण्यासाठी आधी तुमच्या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा आणि नंतर सेटिंग्जमध्ये जा.यानंतर तुम्हाला 'चॅट्स'चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

तुम्ही आता तुमचे WhatsApp डेटाचा बॅकअप घेण्यासाठी तयार आहात. 'चॅट्स' मध्ये तुम्हाला 'बॅकअप टू गुगल ड्राइव्ह' या पर्यायासह 'चॅट बॅकअप' पर्याय दिसेल. येथे जाऊन, तुम्हाला तुमच्या डेटाचा किती वेळा बॅकअप घ्यायचा आहे ते निवडावे लागेल.

जेव्हाही तुम्ही डेटा बॅकअप घेता तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही डेली, वीकली किंवा मंथली यापैकी एक पर्याय निवडाल जेणेकरून वेळोवेळी व्हॉट्सअ‍ॅपचा डेटा गुगल ड्राइव्हवर सेव्ह होईल. तसेच, बॅकअपसाठी मोबाइल डेटाऐवजी वायफाय वापरण्याचा प्रयत्न करा.

तुम्ही Google ड्राइव्हवर बॅकअप घेतलेल्या डेटाचे दुहेरी संरक्षण करण्यासाठी, WhatsApp च्या सेटिंग्जवर जा, 'चॅट्स' मधील 'चॅट्स बॅकअप' वर जा आणि 'एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड बॅकअप' वर क्लिक करा. हा पर्याय निवडल्यानंतर पासवर्ड टाका आणि नंतर 'क्रिएट' चा पर्याय निवडा.