Whatsapp शी वैर नडलं; 74 लाखांहून अधिक अकाऊंट बंद, तुमचं सुरु आहे ना?

WhatsApp bans : IT नियम 2021 नुसार, 50 लाखांपेक्षा जास्त वापरकर्ते असलेल्या कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दर महिन्याला सुरक्षा अहवाल प्रकाशित करावा लागतो. यामध्ये कंपनीने केलेल्या तक्रारी आणि कारवाईची माहिती द्यावी लागेल.

श्वेता चव्हाण | Updated: Jun 2, 2023, 12:57 PM IST
Whatsapp शी वैर नडलं; 74 लाखांहून अधिक अकाऊंट बंद, तुमचं सुरु आहे ना? title=
WhatsApp bans

WhatsApp News In Marathi : लोकप्रिय इन्स्टंट चॅटिंग अॅप whatsapp ने एप्रिल महिन्यात भारतात 75 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली आहे. whatsapp ने जारी केलेल्या अहवालानुसार, कंपनीने 1 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान 74 लाख 52 हजार 500 खात्यांवर बंदी घातली आहे. या खात्यांनी भारतीय कायद्याचे किंवा व्हॉट्सअॅपच्या नियमांचे (WhatsApp rules) उल्लंघन केल्यामुळे खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

एप्रिल महिन्यात 74 लाख वापकर्त्यांवर बंदी

याआधी फेब्रुवारीच्या व्हॉट्सअॅपने 46 लाख भारतीय वापरकर्त्यांवर बंदी घालण्यात आली होती. यापूर्वी जानेवारीमध्ये 29 लाख, डिसेंबरमध्ये 36 लाख आणि नोव्हेंबरमध्ये 37 लाख खाती बंद करण्यात आली होती. IT नियम 2021 नुसार, 50 लाखांहून अधिक वापरकर्ते असलेल्या कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दरमहा एक सुरक्षा अहवाल प्रकाशित करावा लागतो, ज्यामध्ये कंपनीने केलेल्या तक्रारी आणि कारवाईची माहिती द्यावी लागते.

व्हॉट्सअॅपने एप्रिल महिन्यात भारतात 74 लाखांहून अधिक बॅड अकाउंट्सवर बंदी घातली आहे. कंपनीने गुरुवारी सांगितले की नवीन आयटी नियम 2021 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपने आपल्या मासिक अनुपालन अहवालात सांगितले आहे की 1 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान, 74,52,500 खाती प्रतिबंधित करण्यात आली आहेत आणि त्यापैकी 2,469,700 खाती सक्रियपणे बॅन करण्यात आली आहेत.

खाती बंदी?

कंपनीच्या म्हणण्यानुसार, एखाद्याने त्याच्या व्हॉट्सअॅपवर बेकायदेशीर, अश्लील, बदनामीकारक, धमकी देणारा, धमकावणारा किंवा त्रास देणारा, द्वेष पसरवणारा किंवा भडकावणारा मजकूर शेअर केला तर त्याचे खाते बंद करण्यात आले. याशिवाय, जर एखाद्या वापरकर्त्याने कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केले तर त्याचे खाते देखील बॅन केले जाऊ शकते.

चार फोनवर whatsapp

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला व्हॉट्सअॅपने मोठा बदल केला आहे. आता तुम्ही एकाच वेळी चार फोनमध्ये एकच खाते वापरण्याच (लॉग-इन) सक्षम असाल. तसेच व्हॉट्सअॅप वेबच्या मदतीने तुम्ही फोन आणि पीसी (डेस्कटॉप) दोन्हीवर समान खाते वापरू शकता. पण हे फीचर फोनसाठीही उपलब्ध असणे गरजेचे आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअॅपचे हे फीचर काही आठवड्यांत सर्व यूजर्सपर्यंत पोहोचेल. काही दिवसांपूर्वी हे फीचर व्हॉट्सअॅप बीटा यूजर्ससाठी रिलीझ करण्यात आले होते. व्हॉट्सअॅपच्या मूळ कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या नवीन फीचरची माहिती दिली आहे.

4,377 तक्रारी 

देशातील सुमारे 500 दशलक्ष वापरकर्त्यांसह, सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर एप्रिल महिन्यात 4,377 तक्रारी प्राप्त झाल्या असून 234 प्रकरणांवर कारवाई करण्यात आली आहे. या वापरकर्त्याच्या सुरक्षा अहवालात वापरकर्त्याच्या तक्रारी आणि WhatsApp द्वारे केलेल्या कारवाईचा तपशील तसेच WhatsApp द्वारे त्याच्या प्लॅटफॉर्मवरील गैरवर्तनाचा सामना करण्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईचा तपशील देण्यात आला आहे.