मुंबई : इस्टेंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप बंद झालं तर? कदाचित हा प्रश्न कोणालाच आवडणार नाही.
व्हॉट्सअॅप हा आता अनेकांच्या जीवनातला महत्त्वाचा भाग बनला आहे. आज जवळपास जगभरात व्हॉट्सअॅपचा वापर सगळेच करु लागले आहेत. भारतामध्ये याचं प्रमाण देखील खूप मोठं आहे. पण जर व्हॉट्सअॅप अचानक बंद पडलं तर याचा धक्का अनेकांना बसेल. सध्या काही असचं काही वेळेपूर्वी घडलं होतं. जेव्हा व्हॉट्सअॅपचं सर्व्हर डाऊन झालं होतं.
व्हॉट्सअॅप सर्व्हर डाऊन झाल्याने अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. भारतासह अनेक देशांमध्ये हे पाहायला मिळालं. जवळपास १ तास व्हॉट्सअॅप बंद होतं. पण त्यानंतर ते पुन्हा सुरु झालं.
व्हॉट्सअॅप डाउन झाल्याने ना मॅसेज सेंड होत होते ना रिसीव्ह होत होते. मागच्या महिन्यात देखील अशाच प्रकारचा गोंधळ व्हॉट्सअॅपच्या बाबतीत झाला होता. त्यावेळेस युजर्सला प्रोफाइल फोटो बदलतांना त्रास सहन लागला होता. तर दुसऱ्यांचं स्टेटस देखील दिसत नव्हतं.