YouTube वरील सक्तीच्या जाहिरातींना कसं हटवायचं? जाणून घ्या Trick

YouTube वर ही सेटिंग करा आणि फ्रीमध्ये हटवा Ads, कसं ते जाणून घ्या

Updated: Apr 20, 2022, 08:03 PM IST
YouTube वरील सक्तीच्या जाहिरातींना कसं हटवायचं? जाणून घ्या Trick title=

मुंबई : तुम्ही हे पाहिलं असेल की, सुरुवातीला YouTube वर फारशा जाहिराती आपल्याला दिसायच्या नाही. परंतु कालांतराने हे चित्र बदललं आणि जवळ-जवळ सर्वच व्हिडीओसाठी आपल्याला YouTube वर जाहिराती दिसू लागल्या, परंतु त्यासाठी स्किपचा पर्याय दिला जायचा. परंतु आजच्या काळात YouTube इतकं बदललं आहे की, कोणताही व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्याला जाहिरात ही पाहाविच लागते. आता YouTube आपल्याला स्किप करण्याचा पर्याय देत नाही आणि जरी पर्याय दिला तरी, तो दोन जाहिराती दाखवतो आणि त्यांपैकी एक जाहिरात स्किप करण्याचा पर्याय सुचवतो.

YouTube वर 'विनामूल्य' व्हिडीओ पाहता येतं, यासाठी कोणाला ही पैसे द्यावे लागत नाही, परंतु त्यासाठी तुम्हाला YouTube वर त्यांची जाहिरात पाहावी लागत आहे.

यासाठी तुम्ही पैसे नाही पण तुमचा वेळ आणि डेटा घालवून YouTube पाहात आहात. त्यामुळे YouTube तुम्हाला फ्रीमध्ये काहीही देत नाहीय.

त्यामुळे YouTube वर जाहिरातमुक्त अनुभवासाठी, तुम्हाला त्यात प्रीमियम प्रवेश घ्यावा लागेल. तरच तुम्हाला व्हिडीओ विना जाहिरातीचा पाहायला मिळेल. YouTube Premium प्लॅन मासिक 129 रुपयांपासून सुरू होतो.

म्हणजेच काय तर तुम्हाला तुमचा वेळ आणि डेटा वाया घालवायचा नसेल, तर 129 रुपये भरा आणि व्हिडीओ पाहण्याचा आनंद घ्या.

परंतु जर तुम्हाला YouTube ची प्रीमियम योजना खरेदी न करता जाहिरातमुक्त अनुभव हवा असेल, तर यासाठी आम्ही तुम्हाला एक ट्रीक सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला YouTube वर कमी जाहिराती पाहायला मिळतील.

या ट्रीक्स कोणत्या, जाणून घ्या

तुम्हाला यासाठी जाहिरात ब्लॉकरची आवश्यकता असेल. तुम्ही मोबाईल किंवा पर्सनल कॉम्प्युटरवर क्रोम किंवा Edge ब्राउझर वापरत असाल, तर तुम्ही सहज अॅड किंवा जाहिरात ब्लॉकर वापरू शकता.

यासाठी तुम्हाला Adblock For YouTube एक्स्टेंशन वापरावे लागेल. हा एक्स्टेंशनला इस्टॉल केल्यानंतर, तुम्ही जाहिरातींशिवाय YouTube पाहू शकता.

तुम्ही हा दुसरा पर्याय देखील वापरून पाहू शकता

दुसरा मार्ग म्हणजे थर्ड पार्टी ऍड ब्लॉकर ऍप्स वापरणे. यासाठी तुम्हाला Google Play Store वरून Free Adblocker Browser: Adblock & Private Browser डाउनलोड करून इन्स्टॉल करावा लागेल. तुम्ही यासारखे इतर कोणतेही ऍप देखील वापरून पाहू शकता. हा एक साधा ब्राउझर आहे, जो साइट्सवर दिसणार्‍या बहुतेक जाहिराती ब्लॉक करतो.

YouTube वर जाहिरातमुक्त अनुभवासाठी तुम्हाला हा ब्राउझर वापरावा लागेल. यावर तुम्ही तुमच्या आवडीचे सर्च इंजिन देखील निवडू शकता. आता तुम्हाला YouTube शोधावे लागेल आणि तुम्ही जाहिरातीशिवाय तेथे YouTube व्हिडीओ पाहू शकता.