फोटोग्राफी, कंटेंट क्रिएटर्ससाठी सर्वोत्कृष्ट कॅमेरे कोणते...? जाणून घ्या

कॅमेरा घेण्याचा विचार करताय तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय काही बेस्ट पर्याय...

पोपट पिटेकर | Updated: Oct 12, 2022, 12:06 AM IST
फोटोग्राफी, कंटेंट क्रिएटर्ससाठी सर्वोत्कृष्ट कॅमेरे कोणते...? जाणून घ्या title=

पोपट पिटेकर,झी मीडिया, मुंबई : फोटोग्राफी करायला सर्वांनाच आवडतं. फोटोग्राफी करणं हे काही लोकांचा छंद आहे. तर काही लोक व्यवसाय म्हणून करतात. अनेक लोक उत्तम कॅमेरे घेऊन ऑनलाईन कंटेंट देखील बनवतात. कंटेंट उत्तम बनवण्यासाठी कॅमेराची भूमिका खूप महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत तुम्हालाही कॅमेरा घ्यायचा असेल तर आजचा लेख खास तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला सर्वोत्तम DSLR कॅमेऱ्यांची माहिती सांगणार आहोत. ज्यात तुम्हाला कमी किंमतीपासून ते हाय रेंजपर्यंतच्या पर्याय दिसतील. आम्ही जे कॅमेरे सांगणार आहोत ते भारतातील DSLR कॅमेरे आहेत. जे तुमचे कौशल्य वाढवण्यासाठी सर्वोत्तम ठरतील. त्यांचा वापर करणे सोपे आहे. चला तर मग हे सर्वोत्कृष्ट DSLR कॅमेराबाबत जाणून घेऊयात.

सोनी डिजिटल कॅमेरा (Sony Digital Vlog Camera)

सोनी डिजिटल कॅमेरा (Sony dslr camera) तुमचे कौशल्य वाढवण्यासाठी सर्वोत्तम कॅमेरा आहे. या कॅमेराचा वापर करणे अगदी सोपं आहे. तुम्हाला यामध्ये बरीच नाविन्य पूर्ण वैशिष्ट्ये पाहायला मिळतील. सोनी डिजिटल कॅमेरा हे बिल्ट मायक्रोफोनसह येतो. त्याची स्क्रीन फ्लिप करू शकता. ब्लॉगिंग आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी हा एक चांगला कॅमेरा आहे. याच्या मदतीने तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळते. यासोबत येणाऱ्या टाइम-लॅप्स फीचरमुळे व्हिडिओ शूटिंगचा अनुभव आणखी चांगला येईल. Sony dslr कॅमेराची किंमत 69 हजार 990 रुपये पर्यंत आहे. याचे वैशिष्टे म्हणजे हा कॅमेरा वजनाने हलके आणि स्लीम डिझाइनचा आहे. तसेच हे एआय तंत्रज्ञान तसेच सुपर स्लो मोशन आहे.

कॅनन कॅमेर EOS 1500D (Canon EOS 1500D)

कॅनन कॅमेराला युजर्सनी 4.5 रेटिंग दिली आहे. (Canon EOS 1500D 24.1 Digital SLR Camera) हा कॅमेरा APS-C CMOS सेन्सरसह येतो. जे मोठ्या प्रिंट्स किंवा फोटोंसाठी उच्च रिझोल्यूशन देतात. त्याची ISO श्रेणी 100-6400 आहे. याच्या मदतीने तुम्ही अंधारातही चमकदार फोटो क्लिक करू शकता. या कॅमेरामध्ये तुम्हाला व्हिडिओचे फुल एचडी रिझोल्युशन मिळते. कॅनन कॅमऱ्याची (Canon dslr) किंमत 39 हजार 990 रुपये आहे. हा कॅमेऱ्यात  WiFi, NFC आणि Bluetooth कनेक्टिविटी आहे. तसेच यात इंटरचेंजेबल लेंसची वरायटी देखील आहे.

कोडॅक डिजिटल कॅमेरा (KODAK 16MP Digital Camera)

कोडॅक कॅमेरा (KODAK Camera) काळ्या रंगात येतो. यामध्ये तुम्हाला एक पावरफुल 16.1 मेगापिक्सेल CCD सेन्सर मिळतो. जो कोणत्याही ऑब्जेक्टचे पिक्सल आणि गुणवत्ता कमी न करता ऑब्जेक्ट झूम आणि क्रॉप करतो. ब्लिंक आणि स्मूथ कॅप्चर करण्यासाठी यात सेन्सर आहे. या dslr मध्ये तुम्हाला 42X पर्यंत ऑप्टिकल झूम करण्याची सुविधा देण्यात आली आहे. बजेटनुसार हा सर्वोत्तम कॅमेरा आहे. कोडॅक ( KODAK dslr) कॅमेराची किंमत 26 हजार 233 रुपये पर्यंत मिळू शकतो. यात 3 इंच एलसीडी आहे. तसेच ऑटो सीन आणि ऑब्जेक्ट ट्रॅकिंग आहे.

निकॉन डिजिटल कॅमेरा (Nikon D3500 DX-Format DSLR Camera)

निकॉनच्या या D3500 DX-फॉर्मेट कॅमेऱ्याला युजर्सने 4.5 रेटिंग दिले आहे. यात 24.2 MP सह APS-C CMOS सेन्सर आहे. ज्यामुळे तुमचा फोटो आणखी चांगला येतो. या कॅमेऱ्यातील ISOची श्रेणी 100-25600 आहे. या dslr कॅमेरामध्ये तुम्हाला अनेक ऑटो फंक्शन्स दिलेले आहेत. जे तुमचा फोटो सुंदरपणे टिपतात. Nikon dslr कॅमेराची किंमत 63 हजार 950 रुपये पर्यंत मिळतो. हा कॅमेरा खरेदी करण्याच कारण हे आहे की यात हाई रिझोल्यूशन आहे. यात डस्ट रिडक्शन सिस्टमही आहे.

पॅनासोनिक डिजिटल कॅमेरा (Panasonic Digital Camera)

पॅनासोनिकचा हा कॅमेरा अतिशय स्टायलिश आणि पॉवरफुल आहे. या कॅमेराच्या मदतीने, तुम्ही तुमचे फोटोग्राफी अजून सुंदर काढू शकता. हा कॅमेरा 4K मध्ये व्हिडिओ आणि फोटो कॅप्चर करतो. या कॅमेराला dslr मध्ये 3-इंचाचा टच कंट्रोल LCD दिलेला आहे. या पॅनासोनिक ( Panasonic dslr) कॅमेराची किंमत 57 हजार 800 रुपये पर्यंत आहे.  हा कॅमेरा घेण्याचं कारण हे आहे की यात फ़ास्ट फोकस युटीलाइज़िंग  LUMIX DC VARIO लेन्स आहे. तसेच यूएसबी कॅमेरा बॅटरी चार्जिंग देखील आहे.

सोनी प्रीमियम कॉम्पॅक्ट कॅमेरा (Sony RX100M3 Premium Compact Camera)

सोनीच्या या कॅमेराला युजर्सनी 4.5 रेटिंग दिली आहे. या कॅमेरात CMOS फोटो सेन्सर तंत्रज्ञान उपलब्ध आहे. जे ऑटो फोकस तंत्रज्ञानाच्या मदतीने शरीराची हालचाल कॅप्चर करते. हा dslrकॅमेरा प्रवासासाठी उत्तम आहे. याच्या मदतीने तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉगिंगही करू शकता. Sony dslr कॅमेराची किंमत 50 हजार 990 रुपये पर्यंत आहे. या कॅमेराची 2 वर्षांची वॉरंटी आहे. तसेच कॅमेरात बिल्ट इन इलेक्ट्रॉनिक व्यू फाइंडर देखील आहे.

फुजीफिल्म मिररलेस कॅमेरा (Fujifilm Mirrorless Camera )

हा कॅमेरा ब्राऊन रंगात उपलब्ध आहे. हा कॅमेरा खूप सुंदर आणि स्टाइलिश दिसतो. यामध्ये तुम्हाला 24.2 MP APS-C CMOS इमेज सेन्सर मिळतो. जे प्रिमियम दर्जाच्या इमेजेस कॅप्चर करतो. हा कॅमेरा वजनाने खूपच हलका आहे. त्यामुळे तुम्ही सहज याचा वापर करु शकता. हा कॅमेरा dslr चित्रपटांच्या शूटिंगसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. फुजीफिल्म मिररलेस (Fujifilm dslr)कॅमेराची किंमत 59 हजार 990 रुपये आहे. यात टचस्क्रीन LCD
आणि डाइवर्स शूटिंग मोड आहे.