नवी दिल्ली : चीनची मोबाईल फोन निर्माता कंपनी विवोने आज भारतात Vivo V21 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनमधील एक खास गोष्ट म्हणजे त्यात सेल्फीसाठी 44 एमपी कॅमेरा आहे. 6 मेपासून ग्राहकांना हा फोन खरेदी करता येणार आहे. 5G नेटवर्क अद्याप भारतात सुरू झाले नसले तरी बर्याच कंपन्या आता 5G स्मार्टफोन भारतात वेगाने बाजारात आणत आहेत. Vivo V21 5G स्मार्टफोनच्या फिचर्सबद्दल माहिती घेऊया.
Pre-book the all-new #vivoV21, India's slimmest* and coolest smartphone with 44MP OIS Night Selfie. Time to click and capture everything that life has in store for you and #DelightEveryMoment.
To Pre-book now: https://t.co/nK7qBKrauw pic.twitter.com/GmNuhdhZsy
— Vivo India (@Vivo_India) April 29, 2021
8 जीबी + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट्स - 29,990 रुपये
8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट्स - 32,990 रुपये
Vivo V21 5G मध्ये 6.44 इंच, फुल एचडी +, एमोलेड डिस्प्ले आहे.
हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी / 256 जीबी स्टोअर या दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 800 यू चिपसेट आहे. हा स्मार्टफोन डस्क ब्लू, सनसेट डझल आणि आर्क्टिक व्हाइट अशा तीन रंगात आहे.
विवो व्ही 21 5 जी स्मार्टफोन अँड्रॉइड 11 बेस्ड फनटॉच ओएस 11.1 ऑपरेट करते.
या 5 जी स्मार्टफोनमध्ये 4000mAh बॅटरी आहे. यात 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
फोन फक्त 30 मिनिटांत शून्यातून 63 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो असा दावा कंपनीने केलाय.
स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. या स्मार्टफोनचे वजन 176 ग्रॅम आहे.