'या' ऍप्सचा वापर करताय? तर सावधान...

स्मार्टफोन युजर्ससाठी धोका निर्माण करु शकतात.

Updated: Jan 24, 2019, 12:08 PM IST
'या' ऍप्सचा वापर करताय? तर सावधान... title=

नवी दिल्ली- स्मार्टफोन युजर्स त्यांचा स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारचे ऍप्स वापरत असतात. काही चिनी ऍप्स स्मार्टफोन युजर्ससाठी धोका निर्माण करु शकतात. टिकटोक, युसी ब्राउजर, शेअर इट यासारख्या ऍप्सच्या वापरकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. परंतु या युजर्सचा डेटा सुरक्षित आहे का? यावर दुर्लक्ष केले जाते. या ऍप्सला युजर्स त्यांची खासगी माहिती पुरवतात, असे करणे धोकादायक ठरु शकते. 'अरका' माहिती सुरक्षा संस्थेच्या रिसर्चनुसार, चिनी कंपनीचे ऍप्स भारतीय युजर्सला गरजेपेक्षा जास्त माहिती मागत असल्याचे दिसते आहे.

'अरका' संस्थेच्या अहवालानुसार, चिनी ऍप्सच्या माध्यमातून मागितलेली माहिती विदेशी संस्थेला देण्यात येत आहे. टिकटोक, युसी ब्राउझर, शेअर इट यांसह हॅलो, व्हिगो व्हिडिओ, ब्युटी प्लस, न्युड डॉग, व्ही-मेट यांसारख्या ऍप्सचा ही यात समावेश आहे. हे सर्व ऍप्स युजर्सकडे मायक्रोफोनचा ऍक्सेस मागतात. त्याचबरोबर कॅमेराचा ही ऍक्सेस मागितला जातो.  
'अरका' संस्थेचे सह-संस्थापक संदीप राव यांच्या माहितीनुसार, जगभरात टॉपचे ५० ऍप्स आणि चिनचे १० ऍप्स युजर्सकडे गरजेपेक्षा अधिक माहिती मागतात. हे ऍप्स युजर्सची खासगी माहिती विदेशातील सात संस्थांना देत असल्याचे लक्षात आले आहे. यामधून ५० टक्के माहिती अमेरिकेला दिली जाते. तसेच टिकटोकवर जमा केलेली माहिती चीनमधील दूरसंचार कंपन्यांना दिली जाते.