मुंबई : जगभरात गेल्या काही तासापासून फेसबूक (Facebook Down), व्हॉट्सअॅप (Whtsapp Down) आणि इंस्टाग्राम (Instagram Down) डाऊन झालं आहे. हे तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाऊन झाल्याने नेटकरी वैतागले आहेत. त्यामुळे नेटीझन्सच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुढील काही तासांमध्ये या तिन्ही सेव्हा पूर्ववत होतील, असं सोशल मीडिया एक्सपर्टकडून सांगण्यात येत आहे. (Users unable to use WhatsApp Facebook and Instagram down)
मोठ्या प्रमाणात फेसबूक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपचा वैयक्तिक आणि कार्यालयातील कामांसाठी वापर केला जातो. मात्र गेल्या काही तासांपासून अचानक या सेवा ठप्प झाल्याने कामांमध्ये अडचणी येत आहेत. रात्री जवळपास 9 नंतर या तिन्ही अॅपची सेवा ठप्प झाली.
व्हॉट्सअॅपवरुन मेसेज सेंड किंवा रिसिव्ह होत नाहीयेत. हे तिन्ही सोशल मीडिया डाऊन झाल्याच्या काही मिनिटांनी नेटीझन्सना इंटरनेट कनेक्शनमुळे हा त्रास होत असल्याचं वाटत होतं.
त्यामुळे अनेकांनी डेटा स्वीच ऑफ आणि ऑन करुन पाहिलं. मात्र त्यानंतर या तिन्ही सोशल साईड्स डाऊन झाल्याचं वृत्त समोर आलं. मात्र तासाभरापेक्षा अधिक वेळ होऊनही सेवा पुन्हा सुरु न झाल्याने नेटकरी हैराण झाले आहेत.