नवीन कार घ्यायची असेल, तर जरा थांबा! पुढच्या महिन्यात लाँच होणार 'या' पाच जबरदस्त गाड्या

ऑगस्ट महिन्यात मारुति, टोयोटा आणि ह्युंदाई कंपनीच्या पाच गाड्या लाँच होणार आहेत

Updated: Jul 19, 2022, 01:50 PM IST
नवीन कार घ्यायची असेल, तर जरा थांबा! पुढच्या महिन्यात लाँच होणार 'या' पाच जबरदस्त गाड्या title=

Car Launches In August 2022: तुम्ही नवीन कार घेण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा, कारण ऑगस्ट महिन्यात मारुति, टोयोटा आणि ह्युंदाई कंपनीच्या पाच गाड्या लाँच होणार आहेत. या गाड्यांमध्ये दमदार इंजिनसह लेटेस्ट फिचर्स आहेत. ह्युंदाई 4 ऑगस्ट रोजी नव्या पिढीचे ट्यूसॉन लाँच करेल. तसेच तिसऱ्या पिढीची मारुती अल्टो आणि सर्व नवीन ग्रँड विटारा देखील पुढील महिन्यात लाँच केल्या जाऊ शकतात. याशिवाय, टोयोटाची नवीन अर्बन क्रूझर हायरायडर एसयूव्ही आणि नवीन लँड क्रूझर LC300 देखील प्रतीक्षेत आहेत. चला तर या गाड्यांबाबत जाणून घेऊयात

NEW-GEN MARUTI ALTO

मारुती सुझुकी ऑगस्ट 2022 च्या अखेरीस तिसऱ्या पिढीची अल्टो लाँच करू शकते. या गाडीच्या आकारात आणि डिझाइनमध्ये लक्षणीय बदल दिसून येतील. टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण आणि कीलेस एंट्री सारखी वैशिष्ट्ये यात दिली जाऊ शकतात.  1.0L K10C DualJet पेट्रोल आणि सध्याचे 796cc इंजिन यात दोन इंजिन पर्याय मिळू शकतात.

MARUTI GRAND VITARA

आगामी मारुति ग्रँड विटारा ही देशातील इंडो-जपानी ऑटोमेकरची सर्वात महागडी आणि प्रगत एसयूव्ही असेल. हे एस-क्रॉसची जागा घेऊ शकते. नवीन मारुति एसयूव्हीमध्ये रंगीत डिस्प्लेसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि त्याच्या विभागातील सर्वात मोठे पॅनोरामिक सनरूफ असेल. हे हायब्रिड पॉवरट्रेन आणि ड्राइव्ह मोडसह ऑलग्रिप एडब्ल्यूडी प्रणालीसह सुसज्ज असू शकते.

NEW-GEN HYUNDAI TUCSON

नवीन ट्यूसॉनचे अधिकृत बुकिंग सुरू झाली आहे. मात्र, पुढील महिन्यात 4 ऑगस्ट रोजी त्याच्या किमती जाहीर होणार आहेत. या गाडीत अॅडवाँस ड्रायव्हर असिस्टेंस सिस्टम आहे. कारमध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि 8-स्पीकर बोस ऑडिओ सिस्टम यांसारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत. यात 2.0L पेट्रोल आणि 2.0L डिझेल इंजिन आहे.

TOYOTA URBAN CRUISER HYRYDER

टोयोटा नवीन अर्बन क्रूझर हायरायडरसह मध्यम आकाराच्या एसयूव्ही विभागात प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. मात्र, त्याची अधिकृत लाँचिंग तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. हे मॉडेल ऑगस्ट 2022 मध्ये लाँच केले जाऊ शकते. कंपनीने या गाडीच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल आधीच माहिती दिली आहे. यामध्ये माइल्ड हायब्रिड आणि स्ट्राँग हायब्रिड असे दोन पर्याय मिळू शकतात.

NEW TOYOTA LAND CRUISER LC300

नवीन टोयोटा लँड क्रूझर LC300 एसयूव्हीची डिलिव्हरी पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. जपानी ऑटोमेकरने या वर्षाच्या सुरुवातीला प्री-बुकिंग सुरू केली आहे. मात्र सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे तात्पुरते थांबवण्यात आले. या गाडीचं इंजिन 3.3L ट्विन-टर्बो डिझेलद्वारे समर्थित आहे. इंजिन 305bhp पॉवर आणि 700Nm टॉर्क जनरेट करते.