नवी दिल्ली : 50 कोटी मोबाईल युजर्सचे नंबर बंद होणार या बातमीने तुम्हीही हैराण झाला असाल तर आता निर्धास्त व्हालं. डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन आणि यूनीक आइडेंटिफिकेशन अॅथोरिटी ऑफ इंडिया (UIDAI)ने याप्रकारचे वृत्त फेटाळलंय. मोबाईल कनेक्शन घेताना आधार कार्ड अथवा कोणतं ओळखपत्र न देणाऱ्यांचे नंबर बंद होणार असे वृत्त माध्यमांतून फिरत होते.
देशभरात साधारण 100 कोटी मोबाईल कनेक्शन आहेत. यातले 50 कोटी मोबाईल नंबर बंद म्हटलं तर जवळजवळ अर्धैजण यामध्ये येतात.
मोबाईल कनेक्शनवेळी आधार कार्ड नंबर देणाऱ्यांना नवी केवायसी प्रक्रिया पार पाडावी लागेल.
असे करणाऱ्यांना दुसऱ्या ओळख प्रक्रियेचा बॅकअप न मिळाल्यास युजर्सचे नंबर बंद होऊ शकतील अशी बातमी वाऱ्यासारखी फिरत होती.
टेलीकॉम अॅथोरीटी आणि UIDAI यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनामुळे ग्राहकांची चिंता मिटलीयं.
आधार कार्डचा उपयोग ओळखीसाठी केला जाऊ शकत नाही असा निर्णय काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टेलिकॉम कंपन्याना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ दिलीयं.