मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून आयटी क्षेत्राला आलेली मरगळ आता लवकरच दूर होण्याची शक्यता आहे.
यंदा आयटी क्षेत्रामध्ये नव्या नोकर्यांची निर्मिती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नोकरीच्या शोधात असणार्यांना यंदा अनेक चांगल्या संधी उपलब्ध होणार असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. एमडीआय, एसपीजेआयएमआर आणि आयआयएफटी या प्लेसमेंट कंपन्यांद्वारा यंदा नोक-यांच्या जास्त संधी निर्माण झाल्या आहेत.
आयटी क्षेत्रात दोन लाख नोक-यांची निर्मिती होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुडगावच्या एमडीआय प्लेसमेंट कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या बॅचमधील सार्यांनाच 119 कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे.
मागील वर्षी 143 कंपन्या आल्या होत्या. परंतू अनेकांच्या पदरी निराशाच आली होती. नोकरीसोबतच यंदा उमेदवारांना चांगले पॅकेज मिळण्याचीही शक्यता आहे.
प्रतिष्ठीत बिझनेस स्कूलमध्ये शिकणार्यांना चांगल्या ऑफर मिळत असल्याचे चित्र आहे. काहींना परदेशातही मोठ्या पगाराच्या नोकर्या मिळत आहेत.