TVS Sport Vs TVS Star City Plus: देशात सर्वाधिक मागणी ही दुचाकींना आहे. त्यामुळे प्रसिद्ध कंपन्यांनी आपल्या दुचाकी बाजारात लाँच केल्या आहेत. ग्राहक आपल्या बजेटनुसार गाड्यांची निवड करत असतो. मात्र कधी कधी एकाच कंपन्यांच्या दोन बाइकमध्ये संभ्रम निर्माण होतो. नेमकी कोणती बाइक घ्यायचा असा प्रश्न पडतो. टीव्हीएस स्पोर्ट (TVS Sport) आणि टीव्हीएस स्टार सिटी प्लस (TVS Star City+) याबाबत काहीसी अशीच स्थिती आहे. दोन्हीपैकी कोणती बाईक चांगली असेल, याबाबत गोंधळ आहे. आज आम्ही तुम्हाला या दोन्ही बाइकच्या किमती, इंजिन आणि यलेज याबद्दल माहिती देणार आहोत. याच्या मदतीने कोणती बाईक तुमच्यासाठी परफेक्ट आहे, याबाबत माहिती मिळेल.
टीव्हीएस Sport ही बाइक 109.7cc सिंगल सिलेंडर, 4 स्ट्रोक, फ्युएल इंजेक्शन, एअर कूल्ड स्पार्क इग्निशन, BS-VI इंजिनद्वारे समर्थित आहे. हे इंजिन 6.1kW@7350rpm कमाल पॉवर आणि 8.7nm @4500rpm पीक टॉर्क जनरेट करू शकते. बाइकचा टॉप स्पीड 90 किमी/तास आहे. बाइकची लांबी- 1950mm, रुंदी 705mm आणि उंची 1080mm आहे. TVS Sport चा व्हीलबेस 1236 आहे. टीव्हीएस स्पोर्टची किंमत 60130 रुपयांपासून सुरू होते आणि व्हेरियंटनुसार 66493 रुपयांपर्यंत जाते.
टीव्हीएस स्टार सिटी प्लसमध्ये 109.7cc इंजिन आहे. हे ET-FI इको थ्रस्ट इंधन इंजेक्शन तंत्रज्ञानासह BS VI इंजिन आहे. इंजिन 6.03kW@7350rpm कमाल पॉवर आणि 8.7nm@4500rpm पीक टॉर्क जनरेट करते. बाइकचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. बाईकची लांबी- 1984mm, रुंदी 750mm आणि उंची 1080mm आहे. टीव्हीएस स्टार सिटी प्लसचा व्हीलबेस 1260 आहे. टीव्हीएस स्टार सिटी प्लसची किंमत रु.72305 पासून सुरू होते, जी व्हेरियंटनुसार रु.75055 पर्यंत जाते.
टीव्हीएस स्पोर्ट आणि टीव्हीएस स्टार सिटी प्लसचा या दोन्ही बाइक 70kmpl पेक्षा जास्त मायलेज देण्यास सक्षम आहेत. असं असलं तरी मायलेज रस्त्यावरील परिस्थिती आणि ड्रायव्हिंग शैलीवर अवलंबून असतो. कंपनीने आपल्या वेबसाइटवर मायलेजबाबत कोणताही दावा केलेला नाही. आम्ही येथे दिलेला मायलेज माहिती वेगवेगळ्या अहवालांवर आधारित आहे.