नवी दिल्ली : ट्रॅफिक नियमांची माहिती असल्यास आपण अपघातापासून वाचू शकतो. ट्रॅफिक सिग्नलला लागलेल्या तीन रंगांच्या दिव्यांना तुम्ही पाहिले असेल. ज्यामध्ये लाल रंग थांबवण्याचा निर्देश देतो. पिवळा रंग तयार होण्याचा निर्देश देतो. हिरवा रंग पुढे जाण्याचा निर्देश देतो. परंतु या दिव्यांमध्ये लाल, पिवळा आणि हिरव्या रंगाचाच का प्रयोग केला जातो. या बाबत तुम्हाला माहिती आहे का ?
लाल रंग
अन्य रंगापेक्षा लाल रंग जास्त भडक असतो. डोळ्याच्या रेटीनावर सर्वाधिक प्रभाव टाकतो. लाल रंगाला खुपच दुरून पाहता येतो. लाल रंग धोक्याचेही संकेत देतो.
पिवळा रंग
पिवळ्या रंगाचा वापर ट्रॅफिक लाईटमध्ये केला जातो. हा रंग ऊर्जा आणि सुर्याचा प्रतिक मानला जातो. याने आपण रस्त्यावर पुढे मार्गक्रमण करायला तयार होतो.
हिरवा रंग
हिरवा रंग निसर्गाचा आणि शांतीचा प्रतिक मानला जातो. हा रंग डोळ्यांना शांती देतो. हा रंग धोक्याच्या पूर्णत: विरूद्ध काम करतो. त्यामुळे रस्त्यावर कोणत्याही धोक्याशिवाय पुढे जाण्यास हिरवा रंग मदत करतो.
जगातील पहिली ट्रॅफिक लाईट
जगातील पहिली ट्रॅफिक लाईट 10 डिसेंबर 1868 रोजी लंडन येथील ब्रिटिश हाऊस ऑफ पार्लिमेंटच्या समोर लावण्यात आला होता. जे के नाईट नावाच्या रेल्वे इंजिनिअरने हे लाईट लावले होते. रात्रीच्या वेळी याचा वापर करण्यात येत होता.