8 Seater Car खरेदीचा निर्णय बदलला; आता फक्त टॅ्क्सीचालकच खरेदी करू शरणार 'ही' कार

8 Seater Cars: सहसा कार खरेदी करण्याचा विषय आला, की कुटुंबाला साजेशी, सर्व मंडळी मावतील अशी कार खरेदी करण्याकडे अनेकांचाच कल असतो. पण, आता मात्र या निर्णयामध्ये काहीशा अडचणी येतील...   

Updated: Jun 7, 2023, 07:30 AM IST
8 Seater Car खरेदीचा निर्णय बदलला; आता फक्त टॅ्क्सीचालकच खरेदी करू शरणार 'ही' कार title=
toyota Innova 8 Seater car registration process details

8 Seater car registration: 'कोणती कार घ्यायची बरं?' या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी घराघरात गहन चर्चा होते. कारण, इथं मेहनतीच्या कमाईचे पैसे खर्च होणार असतात. मुळात मध्यमवर्गीय कुटुंब असो किंवा आणखी कोण, कार खरेदीच्या वेळी या मंडळींना एकाच गोष्टीची काळजी असते, ती म्हणजे आपण घेत असणारी कार कुटुंबासाठी पुरेशी असेल ना? घरातली मंडळी कारमध्ये सहजपणे प्रवास करू शकतील ना? याच प्रश्नांचं उत्तर म्हणून अखेर एक तोडगा निघतो तो म्हणजे जास्त प्रवासी क्षमता असण्याची कार खरेदी करणं. (how to bug a budget car )

भारतामध्ये (Indian Auto Sector) अशा अनेक कंपन्या आहेत. ज्यांच्या 7 ते 8 सीटर कार मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात. Toyota या जपानच्या कंपनीचं नावही या यादीत येतं. भारतात टोयोटाच्या इनोवा कारचे दोन मॉडेल्स विकले जातात. इनोवा क्रिस्टा आणि इनोवा हायक्रॉस अशी त्या मॉडेल्सची नावं. या दोन्ही कार 7 आणि 8 सीटर अशा दोन व्हॅरिएंटमध्ये विकल्या जातात. पण, आता मात्र या कार खरेदीवर सरकारचा एक नियम लागू होणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Honda ची नवी SUV लाँच; फोटो- फिचर्स पाहूनच कारच्या प्रेमात पडाल

शासनाच्या नव्या नियमामुळं आता या कारच्या 8 सीटर व्हेरिएंटची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना धक्काच बसला आहे. कारण, केंद्रानं तयार केलेल्या नियमानुसार आता 8 Seater वाहनांची नोंदणी खासगी वाहनांमध्ये केली जाणार नाहीये. ज्यामुळं ही वाहनं व्यावसायिक किंवा टॅक्सी (प्रवासी वाहन) या वर्गात नोंदवली जातील. 

नवा नियम लागू? 

केंद्राच्या अख्त्यारित येणाऱ्या परिवहन संकेतस्थळावर 22 मे 2023 पासूनच 8 आणि त्याहून अधिक प्रवासी क्षमता असणाऱ्या वाहनांची खासगी वाहनांमध्ये नोंद करण्याची प्रक्रिया बंद झाली आहे. पण, ही वाहनं टॅक्सी अथवा व्यावसायिक वाहनांच्या विभागात नोंदवता येत आहेत ही लक्षात घेण्याजोगी बाब. 

8 सीटर वाहनांसाठी नवा विभाग 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार भारत सरकारकडून 8 आणि त्याहून अधिक आसनक्षमता असणाऱ्या वाहनांसाठी Omnibus हा एक नवा विभाग तयार केला आहे. याअंतर्गत येणाऱ्या वाहनांना दरवर्षी होणाऱ्या Fitness Certificate चाचणीतून पुढे जावं लागणार आहे. थोडक्यात वाहनाच्या कार्यक्षमतेची चाचणी होणार आहे. 

टोयोटा कारविषयी सांगावं कर, इनोवा क्रिस्टाच्या तुलनेत हायक्रॉस अधिक प्रिमियम कार ठरली. दरम्यान, येत्या काळात टोयोटा एमपीवी चे 8-सीटर व्हेरिएंट बाजारात आणणार होती. ज्यामध्ये शेवटच्या रांगेत तीन प्रावाशांच्या बसण्याची सोय असेल. पण, आता मात्र शासन नियमानपोटी खासगी ग्राहकांना ही कार खरेदी करता येणार नाहीये. पण, व्यावसायिक कारणांसाठी कार खरेदी केली जाऊ शकते. त्यामुळं आता कार कंपनी यावर काही योजना आखते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.